एक्स्प्लोर

Diwali 2022 : तब्बल 27 वर्षांनंतर दिवाळी सणावर ग्रहणाची छाया! यंदाचा दीपोत्सव 5 ऐवजी 6 दिवसांचा

Diwali 2022 : सूर्यग्रहणाचा सर्वाधिक परिणाम लक्ष्मीपूजन ते दीपोत्सव या दिवसांवर होणार आहे. जाणून घ्या

Diwali 2022 : 1995 नंतर आता 2022 मध्ये दिवाळीला (Diwali 2022) सूर्यग्रहण ( Solar Eclipse )होणार आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांशिवाय इतर अनेक देशांमध्येही हे सूर्यग्रहण दिसणार आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम लक्ष्मीपूजन ते दीपोत्सव या दिवसांवर होणार आहे. हा दीपोत्सव यावेळी 5 ऐवजी 6 दिवसांचा असेल. यावेळी दिवाळीत पडणाऱ्या सूर्यग्रहणाचा काय परिणाम होईल? जाणून घ्या


6 दिवसांचा दीपोत्सव 
ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी दीपोत्सव 5 ऐवजी 6 दिवसांचा असेल. कारण दिवाळी ते गोवर्धन पूजा दरम्यान सूर्यग्रहण आहे. अशातच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कोणत्याही प्रकारची पूजा करण्यास मनाई करण्यात आली आहे. सूर्यग्रहणाचे सुतक 12 तास अगोदर सुरू होणार आहे. यानुसार सूर्यग्रहणाच्या सुतकपासून मोक्षकाळापर्यंत कोणत्याही प्रकारची पूजा किंवा इतर धार्मिक कार्य करण्यास मनाई असेल. त्यामुळेच यंदा दीपोत्सवाची वेळ आणखी एक दिवसाने वाढून 5 ऐवजी 6 दिवसांवर आली आहे. मात्र, सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत.

लक्ष्मीपूजनाच्या रात्रीपासून सूर्यग्रहण
ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळी 24 ऑक्टोबरला आहे. मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:22 पासून सूर्यग्रहण सुरू होईल. कारण सुतक काल 12 तास आधी लागतो, म्हणूनच दिवाळीत लक्ष्मीपूजनानंतर, त्याच्या उशिरा रात्री सुतक काल होईल. मंगळवारी दुपारी 4.22 पासून सुरू होणारे सूर्यग्रहण मंगळवारी संध्याकाळी 6.25 पर्यंत राहील. सूर्यग्रहणाचा प्रभाव सुतक काळापासून सुरू होतो आणि सूर्यग्रहण संपेपर्यंत म्हणजेच मोक्षकाळापर्यंत असतो. या काळात धार्मिक कार्यासह इतर सर्व शुभ कार्ये निषिद्ध मानली जातात.


25 रोजी धार्मिक कार्य करण्यास मनाई
25 तारखेला होणारे सूर्यग्रहण असल्याने या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमास बंदी असेल. तर 26 ऑक्टोबर रोजी गोवर्धन पर्व साजरे केले जाणार आहे. दुसऱ्या दिवशी भाऊबीजचा सण असेल.

27 वर्षांनंतर ग्रहणाची छाया
ज्योतिषशास्त्रानुसार, देशातील जवळपास सर्व राज्यांव्यतिरिक्त हे सूर्यग्रहण आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये तसेच युरोपच्या बहुतांश भागात पाहता येईल. याआधीही 1995 मध्ये म्हणजेच 27 वर्षांपूर्वी दिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण आले होते. त्याकाळी सुतक काळापासून मोक्षकाळापर्यंतचा काळ सर्व कामे बंद करून लोकांनी तो दिवस घरीच घालवला होता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Diwali Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Horoscope Today 27 October 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एका मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एका मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Lucky Zodiac Signs : 27 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! बजरंगबलीच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
27 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! बजरंगबलीच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Rahu Ketu Gochar 2026 : डिसेंबर महिन्यात राहू-केतूचं महासंक्रमण! एका झटक्यात नशीब पालटणार, कोणकोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? वाचा लकी राशी
डिसेंबर महिन्यात राहू-केतूचं महासंक्रमण! एका झटक्यात नशीब पालटणार, कोणकोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget