Astrology 11 September 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, 11 सप्टेंबरपासून (Gauri Pujan 2024) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. 11 सप्टेंबरला शुक्र आणि शनि आमनेसामने येऊन षडाष्टक योग निर्माण होत आहे. या योगांचा परिणाम 3 राशींवर झालेला दिसेल. शुक्राच्या संक्रमणामुळे 11 सप्टेंबरपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. नोकरी-व्यवसायात तुमची प्रगती होईल. मान-सन्मान मिळेल. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्ही कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळू शकते. कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी सूर्याचं भ्रमण लाभदायक ठरेल. शिक्षण क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ आता सुरू होईल. या काळात कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. गुंतवणुकीतून लाभ होईल.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. व्यवहारासाठी ही वेळ शुभ आहे. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी लाभ होईल. पैशाची आवक होण्याच्या नवीन संधी मिळतील, उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. या काळात व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Guru Vakri 2024 : दिवाळीआधी गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचा अडचणींचा काळ होणार सुरू, नोकरी-व्यवसायात आतापासूनच थोडं सावध