Astrology : आज ऑगस्ट महिन्यातला दुसरा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस. आजचा दिवस अनेक अर्थांनी खास असणार आहे. आज कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. तसेच, आजच्या दिवशी लक्ष्मी नारायण योग (Yog), हर्षण योग आणि आर्द्रा नक्षत्र असे शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ मेष, कर्क, कन्यासह इतर राशींना होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
ऑगमस्ट महिन्यातील आजचा दुसरा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज तुम्हाला धनलाभाचे संकेत आहेत. तुम्हाला जर नवीन प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. धार्मिक कार्यात तुमचं मन गुंतून राहिल्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल. तुमचा व्यवसाय अधिक विस्ताराने वाढत जाईल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी ज्या अडचणी येत होत्या त्या हळूहळू दूर होतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न असेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असल्यामुळे तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. जोडीदाराबरोबर चाललेले वाद मिटतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी अनेक शुभ परिणाम मिळतील. तुमच्या आरोग्यात हळूहळू सुधारणा होताना दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमचा बॉस तुमच्या कामावर खुश असेल. त्यामुळे तुमच्या पदोन्नतीतही वाढ मिळू शकते. तसेच, नवीन कामाची जबाबदारी देखील तुमच्यावर येऊ शकते. व्यापारी वर्गातील लोकांना देखील चांगला लाभ मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आशेचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल अशी आशा आहे. जर ते काम नाही झाल्यास तुमचा हिरमोड होऊ शकतो. तसेच, आई-वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. धार्मिक कार्यासाठी तुमचे जास्त पैसे खर्च केले जातील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर त्यात सावधानता बाळगण्याची गरज आहे. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. घरात जर कोणतं संकट आलं असेल तर ते लवकरच दूर होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: