Ashadhi Ekadashi Shubh Yog 2025 : हिंदू पंचांगानुसार, वर्षभरात साजरा केल्या जाणाऱ्या एकदाशींपैकीच एक मोठी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. (Ashadhi Ekadashi) या एकादशीला देवशयनी एकादशी असं देखील म्हणतात. तर, आषाढी एकादशीला अवघे दोन दिवस बाकी राहिले आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महारांजासह अनेक पालख्या लवकरच पंढरपुरात दाखल होणार आहे. या ठिकाणी भक्तीचा एक प्रकारे संगम पाहायला मिळतो. या शुभ दिनी ग्रहांची स्थितीसुद्धा बदललेली दिसणार आहे. आषाढी एकदशीच्या दिवशी एक दोन नाही तर तब्बल पाच शुभ संयोग जुळून येणार आहेत. याचा कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

'हे' शुभ योग जुळून येणार 

आषाढी एकादशी येत्या 6 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी 5 अद्भूत योग जुळून येणार आहेत. तर, मिथुन राशीत सूर्य आणि गुरुच्या युतीने आदित्य योग जुळून येणार आहे. हा एक शुभ राजयोग मानला जातो. तर, याचबरोबर मालव्य राजयोग, शुभ योग, साध्य योग, त्रिपुष्कर योग आणि रवि योगासारखे शुभ योग देखील या दिवशी जुळून येणार आहेत. त्यामुळे अनेक राशींसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

आषाढी एकदशीच्या दिवशी जुळून येणाऱ्या योगाचा शुभ लाभ वृषभ राशीच्या लोकांना मिळणार आहे. या काळात तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. या काळात तुम्ही वाहन किंवा दागिने देखील खरेदी करु शकता. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला या काळात भौतिक सुविधांचा लाभ घेता येईल. नोकरदार वर्गातील लोकांच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसून येईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या करिअरचे मार्ग मोकळे होतील. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काम करता येईल. या काळात कौटुंबिक जीवन चांगले राहील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परच मिळतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीमुळे तुमच्या व्यवसायात प्रगती दिसून येईल. नोकरदार वर्गातील लोकांची कामात प्रगती दिसून येईल. तुमचं आर्थिक जीवन सुरळीत चालेल. तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. वाहनसुख मिळेल. शेअर बाजारातील गुंतवणुतीन तुम्हाला लाभ मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :  

Shani Budh Vakri 2025 : तब्बल 500 वर्षांनी श्रावणात होणार शनी-बुध ग्रहाची वक्री; 25 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार 'जॅकपॉट'