Shani Budh Vakri 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 25 जुलै 2025 पासून श्रावण (Shravan 2025) महिन्याला सुरुवात होतेय. श्रावण महिन्यात अनेक मोठ-मोठ्या ग्रहांची हालचाल होणार आहे. यामध्ये कर्मफळदाता शनी (Shani Dev) आणि व्यवसायाचा दाता बुध (Mercury) ग्रहाचा देखील समावेश आहे. शनी देव मीन राशीत वक्री होतील तर बुध ग्रह कर्क राशीत वक्री होणार आहेत. त्यामुळे काही राशींच्या (Zodiac Signs) नशिबाला चार चांद लागणार आहे, या शुभ राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी शनीची उलटी चाल फार लाभदायक ठरणार आहे. या काळात शनी तुमच्या कुंडलीत अकराव्या स्थानावर असतील. तसेच, बुध ग्रह राशीच्या तिसऱ्या भावात वक्री होणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी मिळतील. तसेच, नोकरीत प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. एकूणच हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असेल. या काळात तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. तुमच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनी आणि बुध ग्रहाचं वक्री होणं कर्क राशीसाठी फार लाभदायक ठरेल. या दोन ग्रहांच्या युतीमुळे तुमच्या नशिबाचे दार उघडतील. नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं वातावरण मिळेल. तुमच्या कामात तुमची प्रगती दिसून येईल. या काळात तुमचं धार्मिक कार्यात मन रमेल. तसेच, समाजात तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ पाहायला मिळेल. आरोग्य देखील उत्तम असणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
शनी आणि बुध ग्रहाचं वक्री होणं मीन राशीसाठी फार शुभकारक ठरेल . या काळात तुमचे चांगले दिवस खऱ्या अर्थाने सुरु होतील. त्यामुळे तुम्हाला या काळात अनेक संधीचा लाभ घेता येईल. समाजात तुमचा मान वाढेल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, तुमचं व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा चांगलं राहील. जे लोक प्रेमविवाह करणार आहेत त्यांना चांगली वार्ता मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. नात्यात गोडवा वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :