Bollywood Actor Ranvir Shorey Criticizes MNS Workers: राज्य सरकारनं (Maharashtra Government) काढलेल्या शाळांमधील हिंदी सक्तीच्या (Hindi Language) जीआरवर अनेकांनी संताप व्यक्त केला. अखेर राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर (State Government Hindi Compulsory GR) मागे घेतला. पण, तेव्हापासून मातृभाषा मराठीबाबत (Mother Tongue Marathi) अनेकजण चिंता व्यक्त करत आहेत. तसेच, त्यासोबतच मुंबईत (Mumbai News) गेल्या कित्येक दिवसांपासून मराठी, गुजराती वाद (Marathi, Gujarati Controversy) सुरू आहे.
गेल्या कित्येक दिवसांत बऱ्याच घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच नुकतीच एक घटना घडली, त्यावर बॉलिवूड अभिनेत्यानं (Bollywood Actor) संताप व्यक्त केला आहे. तसेच, मराठी न बोलल्याबद्दल गुजराती दुकानदारावर हल्ला करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांचा बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीनं (Ranvir Shorey) पोस्ट करुन तीव्र निषेध केला आहे.
रणवीर शौरीनं या घटनेवर संताप व्यक्त केला आणि या घटनेला लज्जास्पद म्हटलं आहे. तसेच, रणवीर शौरीनं त्याच्या पोस्टमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं आहे.
रणवीर शौरी काय म्हणाला?
अभिनेत्यानं त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये काही लोक मुंबईतील मीरा रोड परिसरातील एका रेस्टॉरंट मालकाला मराठी बोलता येत नसल्यामुळे मारहाण करताना दिसत आहेत. रणवीर शौरीनं या घटनेचा उल्लेख अत्यंत त्रासदायक असा केला आहे. आणि महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
अभिनेत्यानं यासंदर्भात ट्वीटही केलं आहे. रणवीर शौरी ट्वीट करत म्हणाला की, "हे अत्यंत घृणास्पद आहे. काही राक्षस राजकीय फायदा आणि लक्ष वेधण्यासाठी मोकाट फिरतायत. कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे?"
रणवीरनं पोस्ट केल्यानंतर काही वेळातच त्याची पोस्ट व्हायरल झाली. रणवीरनं त्याच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तरही दिलं आहे. एका युजरनं त्याला विचारलं की, "तुम्ही किती वर्षांपासून महाराष्ट्रात राहाताय? मराठी शिकण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले?"
रणवीर शौरीनं त्या युजरला उत्तर दिलं असून म्हटलंय की, "सर्वात आधी, मी तुमच्यासारख्या द्वेष पसरवणाऱ्या अनोळखी लोकांना कसलंही उत्तर देणार नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की, लोकांना मारुन-मुटकून भाषा शिकवली जाऊ शकते, तर तुमचे विचार फारच चुकीचे आहेत. आणि शेवटची गोष्ट... जर तुम्हाला या गोष्टीवर लक्ष वेधून घ्यायचं असेल, तर फक्त आपला उदरनिर्वाह करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या असहाय्य लोकांना मारहाण करण्यापेक्षा बदलासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी निषेध करण्याचे अधिक सकारात्मक आणि रचनात्मक मार्ग आहेत."
रणवीर शौरी ज्या घटनेवर संतापला, ती घटना नेमकी काय?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक एका रेस्टॉरंटमध्ये जातात. पण, तेथिल मालकाला मराठी भाषा बोलता येत नसते, त्यामुळे त्याला मारहाण करतात. व्हिडीओमध्ये मारहाण करणाऱ्या लोकांच्या गळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्कॉर्फ दिसतोय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :