Aquarius Weekly Horoscope 18 To 24 Feb 2024 : राशीभविष्यानुसार, 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2024 हा आठवडा खास आहे. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...
कुंभ राशीचे करिअर (Aquarius Career Horoscope)
जर तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आधी दुसरी नोकरी शोधा. जॉब पोर्टलवर तुमचा प्रोफाईल अपडेट करा. एखादी नवीन कंपनी तुम्हाला नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावू शकते, ज्यात तुम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळेल. नोकरीत कामावरुन काही वाद होऊ शकतात, तो सोडवण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला असेल, तुम्हाला एक चांगली डील मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा भाग्यवान आहे.
कुंभ राशीची आर्थिक स्थिती (Aquarius Wealth Horoscope)
तुमचा हा आठवडा खर्चिक असेल. पैसे खर्च करताना विचार करा. तुम्हाला जवळ पुरेसे पैसे दिसत असले तरी त्यांची गुंतवणूक देखील तितकीच महत्त्वाची आहे. काही विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या कठीण प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो, कारण एखाद्या कामासाठी पालक तुमच्याकडून पैसे मागू शकतात. व्यवसायिकांना फॅशन, बँकिंग, फार्मास्युटिकल्स आणि वाहतुकीशी संबंधित व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळेल.
कुंभ राशीची लव्ह लाईफ (Aquarius Love Horoscope)
नवीन आठवड्यात तुमच्यात आणि तुमच्या प्रियकरामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात, परंतु खुलेपणाने बोलून या समस्या सोडवली जातील. तुमच्या जोडीदाराला नेहमी महत्त्व द्या आणि रोमँटिक लाईफ प्रियकराच्या मर्जीप्रमाणे ठेवा. नात्यातील लहानसहान समस्या नीट हाताळा, प्रकरण हाताबाहेर जाऊ देऊ नका. जे अविवाहित योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांनी लग्नाची घाई करू नये. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक पैलूंचा विचार केला पाहिजे.
कुंभ राशीचे आरोग्य (Aquarius Health Horoscope)
या आठवड्यात तुम्ही आजारातून बरे व्हाल. काही कुंभ राशीच्या लोकांना त्वचेशी संबंधित समस्या, घशाशी संबंधित समस्या आणि ताप उद्भवण्याची शक्यता आहे. शस्त्रक्रियेसाठी हा आठवडा चांगला आहे, तुम्ही एखादी तारीख ठरवू शकता. ज्या कुंभ राशीच्या लोकांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल काळजी घेणं आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :