Aquarius Horoscope Today 18 November 2023 : कामाच्या ठिकाणी वादाची शक्यता, वैवाहिक जीवनात मात्र आनंद; 'असा' आहे कुंभ राशीचा दिवस
Aquarius Horoscope Today 18 November 2023 : दिवसाच्या सरत्या वेळी नातेवाईकांच्या भेटी-गाठी होतील. कोणतेही काम करण्याआधी कुटुंबीयांना विश्वासात घ्या.
Aquarius Horoscope Today 18 November 2023 : कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) आरोग्यासाठी चांगला असू शकतो. शनिदेव तुमच्या राशीत भ्रमण करत आहेत. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जर आपण काम करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर तुमच्या कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतो. यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. तुम्ही कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर बोलूनही विश्वास ठेवू नका. अन्यथा ती अनोळखी व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकते. व्यवसाय करणार्या लोकांबद्दल बोलायचे तर घरापासून दूर व्यवसाय करणार्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा व्यवसायात तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल.
तुम्हाला तुमच्या बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या बहिणी प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभ्या राहतील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुमचे मन खूप आनंदी असेल, दिर्घकालीन आजार आता हळूहळू कमी होताना दिसेल. तब्येतीती सुधारणा दिसेल. यामुळे तुमचे मन खूप समाधानी राहील. मुलांमुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
कौटुंबिक वातावरण आनंदी राहील
तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करत आहात, तुम्हाला त्यात यश मिळेल. दिवसाच्या सरत्या वेळी नातेवाईकांच्या भेटी-गाठी होतील. कोणतेही काम करण्याआधी कुटुंबीयांना विश्वासात घ्या. तब्येतीची काळजी घ्या. मित्रांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. घरगुती वातावरण आनंदी राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात दिवसेंदिवस चढ-उतारांचा सामना करावा लागेल. वैद्यकीय क्षेत्रात कामाचा ताण वाढेल. आज महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे, प्रयत्न करत राहा. आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसमधील काम वेळेवर पूर्ण करा. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल.
आजचे कुंभ राशीचे आरोग्य
आज तुमचे आरोग्य चांगले राहील परंतु, कुटुंबातील इतर सदस्यांच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटू शकते. याबरोबरच ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांना आज त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कुंभ राशीसाठी आजचे उपाय
मंत्रांसह सूर्यनमस्कार करणे खूप फायदेशीर ठरणार आहे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :