एक्स्प्लोर

Aquarius Horoscope Today 17 April 2023 : कुंभ राशीच्या लोकांच्या वैवाहिक नात्यात गोडवा वाढेल; 'असा' असेल आजचा दिवस

Aquarius Horoscope Today 17 April 2023 : कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. आज तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद होईल.

Aquarius Horoscope Today 17 April 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. आज तुम्हाला तुमच्या कामात कुटुंबाचं सहकार्य मिळेल. आज तुमचे मित्र-मैत्रीण देखील तुम्हाला भेटू शकतात. त्यांच्याबरोबर आनंदाचे क्षण घालवा. आज तुम्हाला जमीन, रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पूर्ण करेल. छोटे व्यापारी आज आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करू शकतात. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील आणि तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. भावाच्या लग्नात येणारे अडथळे दूर होतील. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. तुमच्या मुलांद्वारे तुम्हाला सन्मान मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. 

आंधळेपणाने विश्वास ठेवू नका

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. आज तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद होईल, परंतु तरीही, तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमचा विश्वासघात होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम असण्याचा योग आहे. आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण करतील.

वैवाहिक नात्यात गोडवा येईल

आज तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि दोघेही एकमेकांची काळजी घ्या. आज तुम्हाला भाऊ-बहिणींकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. आज नातेवाईकांशी वाद घालू नका, अन्यथा संबंध बिघडण्याचा धोका आहे. आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कठीण जाईल. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठेपेक्षा कामाकडे जास्त लक्ष द्या. 

आज कुंभ राशीचे आरोग्य 

कुंभ राशीच्या लोकांना इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतंही काम करताना घाई करु नका. तसेच वाहन चालवताना काळजी घ्या. 

कुंभ राशीसाठी आजचे उपाय 

नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी पिंपळाच्या झाडाखाली लोखंडी भांड्यात पाणी, साखर, दूध, तूप मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा. 21 मंगळवारपर्यंत हे व्रत करत राहा.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 17 April 2023 : कन्या, तूळ, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींसाठी पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींसाठी पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी जुलैचा दुसरा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी जुलैचा दुसरा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Mahalaxmi Rajyog 2026 : 16 जुलैला जुळून येणार 'महालक्ष्मी राजयोग'; 4 राशींचं झटक्यात पालटणार नशीब, हातात खेळणार पैसाच पैसा
16 जुलैला जुळून येणार 'महालक्ष्मी राजयोग'; 4 राशींचं झटक्यात पालटणार नशीब, हातात खेळणार पैसाच पैसा

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Embed widget