Apara Ekadashi 2025 : अपरा एकादशी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस आहे, जो ज्येष्ठ कृष्ण पक्षातील एकादशीला येतो. जो 23 मे ला येत आहे याला “अजला एकादशी” असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे.
अपरा एकादशीचे महत्त्व :
- पापांपासून मुक्ती : या एकादशीचे व्रत केल्याने पूर्वीच्या पापांचा नाश होतो आणि मन शुद्ध होते.
- मोक्षप्राप्ती : याचे व्रत मोक्षप्रद मानले गेले आहे, मृत्यूनंतर मोक्ष मिळतो असे मानले जाते.
- पुण्यप्राप्ती : या दिवशी दानधर्म, जप, तप यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे.
- धन, यश आणि समृद्धी : या व्रताचे फल म्हणजे लौकिक जीवनात यश आणि ऐश्वर्याची प्राप्ती.
राशीनुसार उपाय (अपरा एकादशीसाठी) :
मेष रास (Aries Horoscope)
उपाय : सूर्यनारायणाला जल अर्पण करा व “ॐ नमो भगवते वासुदेवाय” मंत्राचा जप करा.
फळ : आत्मविश्वास वाढेल, मानसिक शांती लाभेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
उपाय : विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा व तुळशीला अर्पण करा.
फळ : आर्थिक स्थिती सुधारेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
उपाय : श्रीकृष्णाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक करा.
फळ : बोलण्यात गोडवा येईल, नातेसंबंध सुधारतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
उपाय : अन्नदान किंवा गरीबांना दूध/खीर दान करा.
फळ : घरगुती शांतता व मानसिक स्थैर्य.
सिंह रास (Leo Horoscope)
उपाय : दिवसभर ‘ॐ नारायणाय नमः’ या मंत्राचा जप करा.
फळ : मान-सन्मान आणि यशप्राप्ती.
कन्या रास (Virgo Horoscope)
उपाय : विष्णू मंदिरात झाडू मारून सेवा करा.
फळ : करियरमध्ये प्रगती.
तूळ रास (Libra Horoscope)
उपाय : दिव्यांग किंवा वृद्ध व्यक्तीला वस्त्रदान करा.
फळ : वैवाहिक जीवनात सौख्य.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
उपाय : पिवळे फळ दान करा व विष्णूच्या चरणी ठेवून मग खा.
फळ : आरोग्य व संकटातून सुटका.
धनु रास (Sagittarius Horoscope)
उपाय : गुरूंना नमस्कार करा व पिवळा कपडा दान करा.
फळ : शिक्षण आणि अध्यात्मिक उन्नती.
मकर (Capricorn)
उपाय : काळ्या वस्त्रात उडदाची डाळ दान करा.
फळ : कोर्ट-कचेरीचे प्रश्न सुटतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
उपाय : जलाशयात गायीचे दूध अर्पण करा.
फळ : सामाजिक प्रतिष्ठा व मानसिक समाधान.
मीन रास (Pisces Horoscope)
उपाय : शंखात जल भरून विष्णूला अर्पण करा.
फळ : इच्छित कार्य सिद्ध होईल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)