Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रह जवळपास 18 महिन्यात राशी परिवर्तन करतात. सध्या मंगळ (Mars) ग्रह कर्क राशीत संक्रमण करणार आहे. तर, 7 जून रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. याचाच अर्थ मंगळ ग्रह आपल्या मित्र राशीत म्हणजेच सूर्याच्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींचं नशीब उजळू शकतं.
त्याचबरोबर, मंगळ ग्रहाच्या आशीर्वादाने तुमच्या धन-संपत्तीतही चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी मंगळ ग्रहाचं परिवर्तन फार लाभदायक ठरणार आहे. कारण या राशीच्या लग्न भावात मंगळ ग्रह संक्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. समाजात तुमचं चांगलं स्तर राहील. या काळात गुंतवणूक करणं देखील फायदेशीर ठरेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
मंगळ ग्रहाचं संक्रमण धनु राशीसाठी फार सकारात्मक ठरणार आहे. या राशीच्या कुंडलीत भाग्य स्थानी हा ग्रह संक्रमण करणार आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या पदोन्नतीतही चांगली वाढ झालेली दिसेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी मंगळ ग्रहाचं संक्रमण फार सकारात्मक ठरणार आहे. या राशीच्या मंगळ ग्रह कर्म भावात संक्रमण करणार आहे. त्यामुळे तुमच्या कामकाजात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, जर तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर सुरुवात करायची असल्यास हा तुमच्यासाठी चांगला काळ ठरेल. तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)