Angarki Chaturthi 2025 : श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला (Sankasht Chaturthi) विशेष महत्त्व आहे. कारण यंदाची चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी आली असून तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थी वर्षातून दोनदा येते. यावेळी श्रावणातील मंगळवारी ही चतुर्थी येत असल्या कारणाने या चतुर्थीला फार महत्त्व आहे.

गणपती बाप्पाला (Lord Ganesha) आराध्य दैवत मानले जाते. हिंदू धर्मशस्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला गणरायाची मनोभावे पूजा केल्यास भक्तांना अपेक्षित फळ मिळते. या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचीही परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते. श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते. मात्र, यंदा अंगारकी

अंगारकी संकष्ट चतुर्थी 2025 (Angarki Chaturthi 2025)

श्रावण अंगारकी संकष्ट चतुर्थी 12 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे. अंगारक संकष्ट चतुर्थी तिथीचा प्रारंभ सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, ही चतुर्थी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजून 36 मिनिटांनी समाप्त होणार आहे.

श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी चंद्रोदय वेळ

श्रावणातील अंगारक संकष्ट चतुर्थीचे महत्व अनन्य साधारण आहे. या चतुर्थीला व्रत आणि गणेश पूजन करून चंद्रोदय झाल्यानंतर व्रत सोडले जातात. त्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय पाहूनच उपवास सोडला जातो. यंदा देखील चंद्रोदय रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी होणार असून चंद्रदेवाचे दर्शन घेऊन त्यांना जल वाहून नमस्कार केल्यानंतर गणेशाची आरती करावी व मग उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले जाते.

चंद्रोदय वेळ (Angarki Chaturthi Chandroday Time)

पंचांगानुसार 12 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. त्यानुसार, मुंबईत 9.17, ठाण्यात 9.17, पुण्यात 9.13, रत्नागिरीमध्ये 9 वाजून 16 मिनिटांनी, कोल्हापुरात 9 वाजून 12 मिनिटांनी, साताऱ्यात 9 वाजून 13 मिनटांनी चंद्रोदय दिसेल. तर, नाशिकमध्ये 9 वाजून 13 मिनिटांनी , अहमदनगरमध्ये 9 वाजून 09 मिनिटांनी तर, सावंतवाडीमध्ये 9 वाजून 14 मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे. 

वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चंद्रोदयाच्या वेळेत थोडाफार फरक आहे. चंद्रदर्शन आणि पूजा केल्यांतरच हे व्रत पूर्ण होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                        

Shani Sade Sati : पुढच्या अडीच वर्षांसाठी 'या' 5 राशींचं आयुष्य संकटात; शनीच्या अशुभ प्रभावाने होतील प्रचंड हाल, एकामागोमाग येतील संकटं