Akshay Navami Upay: अक्षय नवमी हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. यावेळी ही शुभ तिथी मंगळवार 21 नोव्हेंबर रोजी आली आहे. या दिवशी सत्ययुग संपून त्रेतायुग सुरू झाल्याची धार्मिक मान्यता आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून दान करण्याची परंपरा आहे, असं केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं आणि त्याचा लाभ अनेक जन्मांपर्यंत राहतो. यावेळी अक्षय नवमीला रवि नावाचा शुभ योगही तयार होत आहे, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व खूप वाढलं आहे. अक्षय नवमीच्या शुभ योगामध्ये काही ज्योतिषीय (Astrology) उपायांचं पालन केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं आणि सर्व दुःख दूर होतात आणि पैशाची कमतरता भासत नाही. अक्षय नवमीच्या दिवशी करावयाच्या या उपायांबद्दल जाणून घेऊया.
या उपायाने नांदेल सुख-समृद्धी
ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय नवमीच्या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करावं आणि पूर्वेकडे तोंड करून ॐ धात्र्ये नमः या मंत्राचा जप करावा. असं केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.
या उपायाने लक्ष्मीची राहील कुटुंबावर कृपा
अक्षय्य नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची कापूर आणि तुपाच्या दिव्याने आरती करून 108 वेळा प्रदक्षिणा घालावी. यासोबतच आवळा वृक्षाखाली ब्राह्मण, गरीब, गरजू लोकांना अन्नदान करावं, असं केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगतीही होते.
या दिशेला लावा आवळ्याचं झाड
अक्षय्य नवमीच्या दिवशी आवळा रोपाचं दान करणं खूप शुभ मानलं जातं. यासोबतच घराच्या उत्तर दिशेला आवळ्याचं झाड लावावं. उत्तर दिशेला झाड लावणं शक्य नसेल तर ते पूर्व दिशेला लावावं. असं केल्याने वास्तू दोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या समस्या दूर होतात.
धनधान्याची कमतरता भासणार नाही
अक्षय नवमीच्या दिवशी व्रत ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी व्रत ठेवा आणि आवळा वृक्षाची पूजा करा आणि भगवान विष्णूला आवळा अर्पण करा. भोग अर्पण केल्यानंतर आवळ्याचं सेवन करावं, असं केल्याने सर्व पापं नष्ट होतात आणि आरोग्यही प्राप्त होतं. तसेच या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना उबदार कपडे दान केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.
या उपायाने अडचणी होतील दूर
अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून हनुमानाला सिंदूर, चोळ आणि सुपारी अर्पण करा. यानंतर, प्रार्थना करा आणि सुंदरकांड पाठ करा. असं केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतात आणि तुम्हाला सर्व समस्यांपासून आराम मिळतो. भगवान विष्णूंसोबत हनुमानाचा आशीर्वादही प्राप्त होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Guru Gochar 2024: गुरुच्या मार्गक्रमणामुळे 2024 मध्ये 'या' 3 राशींना धनलाभ; अडकलेली कामं होणार पूर्ण