Guru Rashi Parivartan 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुच्या (Jupiter) राशी परिवर्तनाला फार महत्त्व आहे. सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्त्वाचं स्थान आहे. गुरू हा सुख-शांति, संपत्ती, ऐश्वर्य, विवाह, धार्मिक कार्याचा कारक आहे. गुरुने एका राशीतून दुसऱ्या राशीत केलेल्या प्रवेशाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. गुरु ग्रह हा एका राशीत 13 महिने असतो. गुरू सध्या मेष राशीत असून नवीन वर्षात 2024 मध्ये तो वृषभ राशीत मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळे नवीन वर्ष काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार, 1 मे 2024 रोजी दुपारी 12:59 वाजता गुरू मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 3 मे 2024 रोजी वृषभ राशीतच गुरुचा अस्त होईल. त्यानंतर 12 जूनला रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गुरुच्या या मार्गक्रमणामुळे 3 राशींना लाभ मिळणार आहे.
मेष रास (Aries)
मेष राशीसाठी 2024 हे वर्ष अतिशय आनंददायी आणि धनलाभ घेऊन येणारं आहे. मेष राशींच्या लोकांसाठी गुरुचं मार्गक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे. गुरुच्या मार्गक्रमणामुळे तुमचं नशीब उघडेल. तुमच्या जीवनात घडत असलेल्या अनेक वाईट गोष्टी दूर होतील. या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार आहे, तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. बँक बॅलन्स वाढेल. तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. येत्या वर्षात तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांति नांदेल. गुरु कृपेने तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी होणार आहात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कर्जापासून तुम्हाला मुक्ती मिळेल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरुचं मार्गक्रमण शुभ सिद्ध होऊ शकतं. 2024 मध्ये गुरूच्या राशीत बदलानंतर गुरू हा कर्क राशीच्या अकराव्या घरात स्थित होणार आहे. हे घर उत्पन्नाचं असल्याने या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. गुरुमुळे येणारे 12 महिने तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. गुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होतील. उत्पन्न वाढेल, नोकरीत बढती मिळू शकते. तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आनंदी राहतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते.
सिंह रास (Leo)
गुरूचं मार्गक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देणारं सिद्ध होईल. गुरुच्या कृपेने तुम्ही चांगले निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. करिअरमध्ये नवी झेप घेता येईल. गुरूच्या कृपेमुळे सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. वैवाहिक जीवन सुखकर होणार आहे. घरातील वातावरण चांगलं राहील. आरोग्य चांगलं राहण्याची चिन्हं देखील आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Margi: 2024 मध्ये 'या' राशींना बसणार शनीची झळ; चुकूनही करू नका 'हे' काम