Acharya Chanakya : लग्नानंतर जसं एका महिलेचं आयुष्य पूर्णपणे बदलतं त्याप्रमाणे लग्नानंतर पुरुषांसमोरील सर्वात मोठं आव्हान असतं ते आई आणि बायको  या त्याच्या आयुष्यातील दोन अनमोल महिलांना सांभाळून घेणं. आईला सांभाळून घेतले तर बायको नाराज होते. सध्याच्या काळात आपल्या कानावर लग्न तुटण्याचे एकच कारण समोर येते. अनेकदा लग्न झालेल्या मुली म्हणतात माझा पती चांगला आहे पण फक्त एकच प्रॉब्लेम आहे, ज्यामुळे त्याचे सगळे गुण निरर्थक ठरतात. ही इज नथिंग बट अ मम्माज बॉय!’अलीकडच्या काळात हा शब्द मुलींकडून इतक्यांदा ऐकला आहे की ह्या पिढीत लग्न तुटण्याच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण मानले जाते. आता मम्माज बॉय! होणे योग्य की अयोग्य या वादात सध्या आपल्याला पडायचे नाही. पण भारतीय राज्यशास्त्राचा जनक ज्याचे नाव घेतले तरी  सामान्यपणे आपल्या भुवया उंचावतात आणि प्रतिभावंत आणि कुशाग्र बुद्धिमत्तेची व्यक्ती म्हणजे  आचार्य चाणक्य.. ज्या आचार्य चाणक्यांची कूटनीती जगप्रसिद्ध होती ते चाणक्य (Acharya Chanakya) 'मम्माज बॉय' होते असे म्हटलं तर विश्वास नाही बसणार पण आज आम्ही आचार्य चाणक्य आणि त्यांच्या मातृप्रेमाविषयी सांगणर आहे. 


आचार्य चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये गणले जातात. चाणक्यनीतीमध्ये त्यांनी अनेक विषयांची सविस्तर चर्चा केली आहे. आचार्य चाणक्या यांनी मानवाच्या कल्याणाबाबतचे त्यांचे विचार श्लोकांच्या माध्यमातून मांडले आहेत. तसेच आईविषयी देखील आचार्य चाणक्यांनी लिहिले आहे. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आचार्य चाणक्यांचे देखील त्यांच्या आईवर   प्रेम होते.  आचार्य चाणक्यांसाठी  आई सर्वस्व होते. महाभारतात ज्याप्रमाणे  एकलव्याने आपल्या गुरु द्रोणाचार्यांसाठी अंगठा कापून त्याने गुरु दक्षिणा म्हणून तो गुरूसमोर अर्पण केला.त्याप्रमाणे आई नाराज होऊ नये यासठी आचार्य चाणक्यांनी आईसाठी दात तोडला होता.


आचार्य चाणक्य हे मौर्य साम्राज्यातील महान ज्ञानी होते. एके दिवशी चाणक्याच्या अनुपस्थितीत एक ज्योतिषी त्याच्या घरी आला. आचार्य चाणक्यांच्या आईने त्यांना चाणक्यांची जन्म पत्रिका दाखवली. पत्रिका बघून ज्योतिषी म्हणाले, तुमच्या मुलाचे ग्रह खूप बलवान आहेत. तुमचा मुलगा  सम्राट होईल. तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर त्याच्या पुढील दातावर नागराजाची खूण आहे.  ही खूण म्हणजे त्याच्या सम्राट होण्याचा संकेत आहे.


आचार्य चाणक्यांची आई का दु:खी झाली?


ज्योतिषाचे भाकीत ऐकून चाणक्याची आई दु:खी झाली. तिला आपल्या मुलाला कायम सोबत ठेवायचे  होते. सम्राट झाल्यावर मुलगा राज्यकारभारात इतका व्यस्त होईल की त्याला माझी पर्वाही होणार नाही. हा विचार करून आई दु:खी झाली. चाणक्य परत आल्यावर आईने ओल्या डोळ्यांनी सर्व कथा सांगितली. चाणक्याने आरशात समोरच्या दातावर नागराजची खूण पाहिली आणि मनात काहीतरी ठरवले आणि घरातून निघून गेले. 


आचार्य चाणक्यांनी का तोडला स्वत:चा दात?


ज्या ज्योतिषांच्या भविष्याने आईच्या डोळ्यात पाणी आले तो नागराजाची खूण असलेला दात चाणक्यांनी स्वत:  दगडाने तोडला. दात तोडल्यानंतर  मग घरी आल्यावर त्यांनी तो दात आईसमोर ठेवला आणि म्हणाले, आई हे तुझ्यासाठी! तुझ्यासमोर सम्राट असण्याला देखील किंमत नाही.मुलाचा हा त्याग पाहून आईला आनंद झाला. मम्माज बॉय म्हणत  घटस्फोट घेणे, आई-वडिलांवर हात उचलणे, घराबाहेर हाकलून देणे, असे अत्यंत निंदनीय कृत्य करणाऱ्या आजच्या मुलांसाठी हे मातृभक्तीचे अनोखे उदाहरण आहे. खरे तर आई-वडील हे या पृथ्वीतलावरचे प्रत्यक्ष दैवत आहेत, ज्यांच्या सेवेने अपार पुण्य मिळते.


हे ही वाचा :


Chanakya Niti: गाढवाला जे उमजलं ते आपल्याला नाही कळलं; चाणक्यांनी सांगितले गाढवाकडून शिका 'या' तीन गोष्टी, अपयश कधीच येणार नाही!