Apali Dosti Ek Number : हिंदी, पंजाबी प्रमाणेच मराठी संगीत क्षेत्रातही नवनवीन गाणी प्रदर्शित होऊन व्हायरल होताना दिसतात. आत्तापर्यंत ‘दिलाची चोरी’, ‘कारभारी’, ‘रिमझिम’, ‘माझं हृदय’ अशी जवळपास 12 मराठी गाण्यांची निर्मिती करणारा निर्माता मनोज सांगळे 'आपली दोस्ती एक नंबर' (Apali Dosti Ek Number)  हे गाणं मैत्रीदिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. हे गाणं नुकतचं 'एम एस प्रॉडक्शन'वर प्रदर्शित झालं आहे‌. या गाण्याने सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. मैत्रीचे कोमल भावबंध उलगडणारं हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.


एम. एस. प्रॉडक्शन आणि डि जी. फिल्म प्रॉडक्शन यांनी या गाण्यात एकत्र काम केले आहे. काही क्षणातच या गाण्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.


पाहा गाणे :



या गाण्याविषयी बोलताना निर्माते मनोज सांगळे सांगतात की, ‘हे गाणं म्हणजे माझ्यासाठी ड्रिम प्रोजेक्ट आहे. कॉलेजमध्ये असताना मी ठरवलं होतं की, मैत्री हा विषय घेऊन एक सुंदर गाणं करायचं. मैत्री हे एक‌ असं नातं आहे जे रक्ताच्या ही पलिकडे असतं. मैत्री करताना आपण काहीच नाही बघतं, तसंच जात पात देखील पाहत नाही. हेच या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणं मी एम एस प्रॉडक्शनच्या संपूर्ण टीम‌ला आणि माझा खास मित्र अविनाश सोनावणे यांना समर्पित करतो.’


‘आपली दोस्ती एक नंबर' या गाण्याचे गीतकार प्रशांत तिडके आहेत, तर संगीतकार सौरभ मस्तोलीने या गाण्याचे संगीत केले आहे. गायक ऋषिकेश शेलार आणि गायिका स्नेहा महाडिक हीने हे गाणं गाऊन या गाण्याला चार चांद लावले आहेत. या गाण्यात ऋषिकेश तिकोणे, जगदीश निकम, मिकी झेहेन, मनोज सांगळे, तनू भोसले, शिवानी कांबळे, आरती थोरवे, साहिल दराडे, ऋतुजा मुसळे आणि शरद जोपले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र 'आपली दोस्ती एक नंबर' या गाण्याची चर्चा आहे.


हेही वाचा :


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Saurabh Ghadge : आम्ही इन्फ्ल्युन्सर नाही तर कॉन्टेंट क्रिएटर : सौरभ घाडगे