Washim News : सध्या राज्यातील शेतकरी (Farmers)विविध संकटाचा सामना करत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अतिवृष्टीचा (Heavy rain) तर खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. वाशिम (Washim) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या पावसाचा खूप मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, प्रशासन, सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही.  त्यामुळं राजकारणातील सध्याच्या अवस्थेनं व्यथित झालेल्या एका शेतकऱ्यानं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर आपली व्यथा मांडणारं पोस्टर लावलं आहे. 'न्याय देता का कधी भेटू?' असा सवाल या पोस्टरव्दारे शेतकऱ्यानं केला आहे.




कुरघोड्या बंद करा, शेतकऱ्यांना न्याय द्या


वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ग्राम अंचळ येथील दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखडे हे आपली शेतजमिन मिळवण्यासाठी गेल्या बारा वर्षापासून लोकशाही व्यवस्थेनुसार प्रशासनाशी लढत आहेत. आपल्याकडं प्रशासनाचे लक्ष वेधले जावे, आपल्याला न्याय मिळावा या हेतूने वानखडे यांनी पोस्टरच्या माध्यमातून अनोख्या पध्दतीचं आंदोलन केलं आहे. शेतकरी अनंत अडचणीत आहे. मात्र, त्याकडे लक्ष देण्यासाठी सत्ताधाऱ्याकडे वेळ नाही. निवडणुकीतसाठी सज्ज असलेलं सरकार शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळात कोरडी आश्वासन देत आहे. आमची सहनशिलता संपली आहे. उखाळ्या, पाखाळ्या, कुरघोड्या बंद करा, शेतकऱ्यांना भिक नको, कुत्रे आवरा, रक्षकच झाले भक्षक, वाशिम जिल्ह्यातील भ्रष्टाचारी प्रशासनाचा नंगानाच बंद करा' अशी वाक्ये लिहून पोस्टर च्या माध्यमातून राज्यकर्ते आणी प्रशासनाला जागं करण्यासाठी लक्षवेधी पोस्टर आंदोलन केलं आहे. या पोस्टरमध्ये बाबुराव वानखडे यांच्या फोटोसोबतच वरच्या बाजुला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो लावले आहेत.




दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना मदत द्यावी


यावर्षी अतिवृष्टीमुळं शेकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. सरकारनं शेतकऱ्यांचे हाल लावले आहेत. निसर्ग कोपल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा स्थितीत सरकार मात्र, शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे मत शेतकरी बाबुराव वानखडे यांनी व्यक्त केलं. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे, तरीदेखील अद्याप शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत शासनानं जाहीर केली नसल्याचे वानखेडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे पोस्टर मी लावल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मला भेटायला कधी वेळ देता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी विनंती त्यांनी केली. शेतकऱ्याची दखल कोणाही घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


महत्त्वाच्या बातम्या:


Wardha Rains : अतिवृष्टीतून बचावलेले पीक परतीच्या पावसामुळे उद्ध्वस्त, दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर संकट