Maharashtra Monsoon : सध्या राज्यात काही भागात परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या परतीच्या पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. मुंबईसह ठाण्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अन्य ठिकाणी मात्र, परतीच्या पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजपासूनच परतीचा मान्सून माघारी फिरणार आहे. त्यामुळं उद्यापासून (15 ऑक्टोबर) राज्यात उघडीपीची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र, सध्या मुंबईसह ठाणे परिसरात ढगाळ वातावरण असून, पावसाची शक्यता आहे.


खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान


परतीच्या पावसानं अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. या पावसामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यात शेती पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सध्या खरीपाच्या पिकांची काढणी सुरु आहे. सोयाबीन, कापूस, मूग तसेच भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पिकांची काढणी सुरु असतानाच पावसानं हजेरी लावल्यानं उभी पिकं पाण्यात गेली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच द्राक्ष बागांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्यात आजपासून राज्यातील मान्सून माघारी फिरणार आहे.


ढगाळ वातावरण असले तरी राज्यात उघडीप होणार


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मागील पाच ते सहा दिवस जोरदार पावसानं हजेरी लावली. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात परतीच्या पावसाचा चांगलाच जोर होता. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, उद्यापासूनन  (15 ऑक्टोबरपासून) राज्यात ढगाळ वातावरण जरी असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात उघडीपच जाणवेल. अगदीच कुठे तरी तुरळक पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 14 ऑक्टोबरपासून म्हणजे उद्यापासून परतीच्या मान्सूनच्या माघारी फिरण्याच्या प्रक्रियेला चालना मिळण्याची शक्यता आहे.  


20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान किरोकोळ पावसाची शक्यता


दिवाळ सणादरम्यान साधारण 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान राज्यात किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले. रब्बी हंगामाच्या शेवटच्या आवर्तनातील किरकोळ पाऊस पडणार आहे. मात्र, उद्यापासून राज्यात न्सून माघारी फिरण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे. त्यामुळं राज्यात पावसाची उघडीप होणार आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


दिलासादायक बातमी! निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत, दिवाळी गोड होणार!