Turmeric Price : हिंगोलीत (Hingoli) हळदीला (Turmeric) आत्तापर्यंतचा विक्रमी दर मिळाला आहे. हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला तब्बल 35 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. हळदीच्या दरामध्ये  (Turmeric Price) सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे ववातावरण पाहायला मिळत आहे. 


हळदीला विक्रमी दर मिळाल्यानं शेतकरी आनंदी


मागील महिनाभरापासून हळदीच्या भावामध्ये विक्रमी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला तब्बल 35 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे.  वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खांडेगाव येथील शेतकरी माधवराव पतंगे यांच्या हळदीला 35 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे. माधवराव पतंगे यांनी त्यांच्याकडे असलेली 10 क्विंटल हळद वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणली होती. हळदीचा दर्जा चांगल्या पद्धतीचा असल्याने या हळदीला तब्बल 35 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. हळदीला विक्रमी दर मिळाल्याने शेतकरी माधवराव पतंगे आनंदी झाले. तसेच हळदीच्या दरात वाढ होत असल्यानं इतर शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.  


10 क्विंटल हळद विकून तीन लाख 50 हजार रुपये


दरम्यान, मागील आठवड्यामध्ये हळदीला तीस हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला होता. हा आत्तापर्यंतचा विक्रमी दर मानला जात होता. परंतू या आठवड्यात हळदीला 35 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. दरात आणखी वाढ होतानाच दिसत आहे. त्यामुळं हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, शेतकरी माधवराव पतंगे यांनी 10 क्विंटल हळद विकून तीन लाख 50 हजारांचा मोबदला मिळाला आहे.


हिंगोली जिल्हा हळदीचे हब


हळदीचे हब म्हणून हिंगोली जिल्ह्याला ओळखलं जातं. राज्यात सांगलीनंतर (Sangli) सर्वात जास्त हळदीची विक्री (Sale of turmeric) ही हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात होते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात हळदीची विक्री हिंगोलीच्या (Hingoli) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असल्याचं चित्र दिसत आहे. हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाराही महिने हळदीची विक्री होत असते. वसमतच्या बाजार समितीत हळदीला सोन्यासारखा भाव मिळाला आहे. बाजार समितीत हळदीला तब्बल 35 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Turmeric Price : वसमत बाजार समितीत हळदीला आत्तापर्यंतचा विक्रमी दर, क्विंटलला 30 हजार रुपये मिळाल्यानं बळीराजा समाधानी