Turmeric News : भारतीय हळदीला (Turmeric) जगभरातून मागणी वाढत आहे. यंदा देशातून हळदीची विक्रमी निर्यात (export) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा देशातून 2 लाख टन हळदीच्या निर्यात होण्याची शक्यता आहे. भारतीय हळदीला सध्या जगभरातून मागणी वाढली आहे. गेल्या तीन वर्षापासून हळद निर्यातीत भारताचे आकडे वाढत असल्याचे दिसत आहे.


कोरोना काळात बाजारपेठा बंद असतानाही देशातून हळदीची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली होती. त्यामुळं हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही अच्छे दिन आले आहेत. गेल्या वर्षी देशातून 1 लाख 83 हजार 868 टन हळदीची निर्यात झाली होती. तर, यंदाच्या वर्षात जुलै अखेर 1 लाख 53 हजार 154 टन हळदीची निर्यात झाली आहे. त्यामुळं यंदा वर्ष अखेपर्यंत दोन लाख टनांहून अधिक हळदीची निर्यात शक्य असल्याचा अंदाज सांगलीच्या कसबे-डिग्रज येथील हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे. 


तीन वर्षांपासून हळदीच्या निर्यातीत सतत वाढ


हळदीची यंदा दोन लाख टन निर्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नव्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. औषध म्हणून हळदीचे महत्त्व लक्षात आल्यामुळं हळदीची निर्यात यंदा विक्रमी म्हणजे दोन लाख टनांहून अधिक होणार आहे. भारतातून गेल्या तीन वर्षांपासून हळदीच्या निर्यातीत सतत वाढ होत आहे. करोना काळात हळदीचा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयोग अनेक राष्ट्रांमध्ये नव्याने होऊ लागला. औषध म्हणून हळदीचे महत्त्व लक्षात आल्यामुळे हळदीची निर्यात यंदा विक्रमी म्हणजे दोन लाख टनांहून अधिक होणार आहे.


2020-21 मध्ये देशातून 1 लाख 83 हजार 868 टन हळदीची निर्यात


2020-21 मध्ये देशातून 1 लाख 83 हजार 868 टन हळदीची निर्यात झाली होती. 21-22 मध्ये जुलैअखेर 1 लाख 53 हजार 154 टन हळदीची निर्यात झाली आहे. वर्षअखेपर्यंत दोन लाख टनांहून अधिक हळदीची निर्यात शक्य आहे, असा अंदाज कसबे-डिग्रज (सांगली) येथील हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे. जगभरात होत असलेला आयुर्वेदाचा प्रसार आणि करोनानंतर जगभरात हळदीचा वापर वाढला आहे. 2018-19 मध्ये 1 लाख 33 हजार 600 टन इतकी हळद निर्यात झाली होती. सन 2019-20 हळदीची निर्यात 4 हजार 50 टनांनी वाढून 1 लाख 37 हजार 650 टनापर्यंत पोहोचली होती. 2020 मध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला. हळूहळू प्रादुर्भाव वाढू लागला. परिणामी निर्यात काही प्रमाणात बंद होती. त्यामुळं निर्यात घटेल असा अंदाज होता. मात्र, याच काळात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात हळदीचा वापर वाढला आहे. सन 2020-21 मध्ये हळदीची 1 लाख 83  हजार 868 टन निर्यात झाली. अर्थात 46 हजार 218 टनाने वाढली आहे.


हळदीचे एकूण 80 टक्के उत्पादन भारतातच 


जगभरातून देशातील हळदीला मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून हळदीची निर्यात सतत वाढत आहे. सध्या देशातून 1 लाख 53 हजार 154 टन हळदीची निर्यात झाली असून, ही निर्यात दोन लाख टनांपर्यंत पोहोचेल, याची खात्री आहे. जगात भारत हळद उत्पादनात अव्वल आहे. हळदीचे एकूण 80 टक्के उत्पादन भारतातच होते. आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तामीळनाडूमध्ये सर्वाधिक हळद होते. इथल्या हळदीचा दर्जा चांगला असतो. त्यामुळे अमेरिका, इंग्लडसह अरब देशांतून हळदीला चांगली मागणी आहे. कोरोनानंतर जगभरात हळदीचा वापर वाढत चालला आहे. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो  हळद गरम पाण्याबरोबर घेतल्याने मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासून प्रतिबंध होतो.



गेल्या चार वर्षातील निर्यात



  • वर्ष           निर्यात  (टनांत)        उलाढाल  (लाखांत)         

  • २०१८-१९       १,३३,६००       १४१,६१६

  • २०१९-२०       १,३७,६५०       १२८,६९०

  • २०२०-२१       १,८३,८६८       १७२,२६४

  • २०२१-२२       १,५३,१५४       १७८,४३३