Tur Market Price अकोला अकोल्याच्या कृषी बाजारात 2024 अखेरच्या दिवशी नव्या तुरीच्या दरात मोठी घसरण झालीये. आज 465 रुपयांनी प्रतिक्विंटल मागे तुरीच्या दरात घसरण झालीये.  गेल्या काही दिवसांत तुरीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले होते. मात्र, कालपर्यंत तुरीच्या दरात पुन्हा काहीशी तेजी आली होती. परंतु, आज अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या तुरीला 6 हजार 550 रुपयांपासून 8 हजार 140 रूपयांपर्यंत कमाल भाव मिळालाय. कालच्या तुलनेत आज तुरीचे दरात 465 रुपयांनी खाली आलेयेत. मात्र, काल तुरीला कमाल भाव 8605 रुपये इतका क्विंटलमागे होताय. अकोल्यात सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी  7700 रुपये भाव  मिळतो आहे.


गेल्या  15 दिवसांत अकोल्यात तुरीला मिळालेला भाव


  दिनांक            किमान     कमाल 
12 डिसेंबर          7900     9745
13 डिसेंबर          7900     9800
14 डिसेंबर          7500     9600
17 डिसेंबर          6000     8000
18 डिसेंबर          7000     7875
19 डिसेंबर          7000     8670
20 डिसेंबर          7000     8205
21 डिसेंबर          6400     8505
23 डिसेंबर          6300     7415
24 डिसेंबर          6000     8185
25 डिसेंबर          5800     7890
26 डिसेंबर          6200     7680
29 डिसेंबर          6300     8405
30 डिसेंबर          6300     8605
31 डिसेंबर          6550     8140


विदर्भातही रसाळ स्ट्रॉबेरीची चव!


आता विदर्भाच्या मातीतही तुम्हाला स्ट्रॉबेरीची चव चाखायला मिळणारेय. अकोल्यातल्या पातूर, अकोट आणि तेल्हारा तालुक्यांतील वातावरण स्ट्रॉबेरी'साठी पोषक असल्याचे समोर आलेये.. यामुळे या भागातही या पिकांचा प्रसार करण्याचा कृषी शास्त्रज्ञांचा मानस आहे. विशेष म्हणजे, तेल्हारा तालुक्यातल्या अंकित म्हसाळ या 26 वर्षीय तरुणाने स्ट्रॉबेरीची लागवड केली आहेय. इतकेच नव्हेतर वर्धा जिल्ह्यातल्या सेलसुरा कृषी विज्ञान केंद्रांतर्गत 8 शेतकऱ्यांनी महाबळेश्वर येथून रोपे आणून 18 हेक्टरवर स्ट्रॉबेरी लागवड केलीये.


हे ही वाचा