Agriculture News : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी (Dr. Abhilaksha Likhi) यांनी बारामतीमधील (Baramati) भाजीपाला उत्कृष्टता केंद्राला भेट दिली. भारत आणि डच यांच्या सहकार्यानं भाजीपाला उत्कृष्टता केंद्र स्थापित करण्यात आलं आहे. यावेळी लिखी यांनी येथील शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला. भाजीपाला उत्पादनासाठी प्रात्यक्षिक केंद्र स्थापन करणं. तसेच या  क्षेत्रातील विस्तार अधिकारी आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या  माध्यमातून  तंत्रज्ञान हस्तांतरित करणे हा, उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यामागचा उद्देश आहे. दरम्यान, उत्कृष्टता केंद्राचा लाभ हा लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना मिळावा असेही लिखी म्हणाले.


भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी आणि पुरवठा साखळीतील नुकसान कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रगत तंत्रज्ञानाची ओळख  शेतकरी आणि विस्तार अधिकाऱ्यांना  करुन दिली जात आहे.
विविध स्तरावरील अधिकारी, स्वयंसेवी संस्था, खासगी उद्योजक इत्यादींच्या प्रशिक्षणाची सुविधा या उत्कृष्टता केंद्रात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मूल्य साखळी विकसित करण्याचा, रोजगार निर्मिती आणि बाजार बुद्धिमत्तेला चालना देण्याचा मार्ग या केंद्राने मोकळा केला आहे.


तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न व्हावेत
 
दरम्यान, अनेक तरुणांना शेतीकडे आकर्षित करताना, हे केंद्र गरजू लोकांना स्वयंरोजगार आणि तंत्रज्ञान जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं  प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देखील प्रदान करते. भारत आणि डच सहकार्याने स्थापण्यात येणाऱ्या  7 केंद्रांना आतापर्यंत 4 राज्यांमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 2 केंद्रांचे काम  पूर्ण झाले आहे. तसेच 5  उत्कृष्टता केंद्र पूर्ण होण्याच्या  टप्प्यांवर आहेत.


कमी संसाधनांमधून जास्तीत जास्त उत्पादन घेणं हाच उत्कृष्टता केंद्राचा उद्देश


डॉ. अभिलक्ष लिखी यांनी बारामती येथील उत्कृष्टता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, डच ग्रीन हाऊसलाही यावेळी भेट दिली. याचा उद्देश कमी संसाधनांमधून जास्तीत जास्त पीक उत्पादन घेणे हा आहे  उदा. पाणी, कीटकनाशके, मनुष्यबळ इ, जे केवळ उद्योजकांसाठी मूल्य वाढवत नाही तर अवशेष मुक्त उत्पादनाची गुणवत्ता देखील वाढवते. संरक्षित लागवडीखालील तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यावर या ग्रीन हाऊसने  मुख्य लक्ष केंद्रित केले असल्याचे लिखी यांनी सांगतिले. बारामतीच्या उत्कृष्टता केंद्राच्या कार्याचाही यावेळी लिखी यांनी आढावा घेतला. यावेळी उत्कृष्टता केंद्राच्या  संचालकांनी तपशीलवार सादरीकरण केले. या प्रदेशात कार्यरत कृषी  स्टार्ट-अप्स,  सर्व 7 उत्कृष्टता केंद्र  आणि 3 खासगी उत्कृष्टता केंद्रांनी  व्यवहार खर्च कमी करण्यासाठी आणि फळे, भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेत अधिक चांगले दुवे  निर्माण करण्यासाठी त्यांच्याद्वारे वापरल्या जाणार्‍या नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले.


महत्त्वाच्या बातम्या: