Guava farming : अलिकडच्या काळात तरुण शेतकरी (Farmers) आपल्या शेतात विविध प्रयोग करत आहेत. आधुनिक पद्धतीनं शेती करत भरघोस उत्पन्न घेत आहेत. अशाच एका शेतकऱ्यानं पेरुच्या फळबागेतून लाखो रुपयांचा नफा कमावला आहे. हरियाणातील (Haryana) जिंद येथील प्रगतशील शेतकरी सुनील कंडेला असे त्यांचे नाव आहे. सुनील यांना मार्केटिंगसाठी बाजारात जाण्याची गरज नाही. त्यांचे पेरुचे उत्पादन घरबसल्या ऑनलाइन विकले जाते.


एक पेरुची किंमत 150 ते 250 रुपये


आपल्या देशात मोठ्या आकाराचे पेरु पसंत केले जातात. या पेरुंना बाजारात मोठी मागणी असते. साधारणपणे 4 ते 5 पेरुंचे वजन एक किलो असते. पण सुनील यांनी पिकवलेल्या जंबो आकाराच्या पेरुचे वजन 1 किलोपेक्षा जास्त आहे. शेतकरी सुनील कंडेला यांच्या पेरुच्या बागेतील एका पेरुचे वजन दीड किलोपर्यंत आहे. हा विशाल पेरु दिसायला तर सुंदरच आहे, पण त्याची चवही उत्तम आहे. सुनील यांना मार्केटिंगसाठी बाजारात जाण्याची गरज नाही. त्यांचे पेरुचे उत्पादन घरबसल्या ऑनलाइन विकले जाते. एक पेरु 150 ते 250 रुपयांपर्यंत विकला जातो. यातून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.


थाई पेरुची लागवड, वर्षाला लाखोंची कमाई


सुनील कंडेला म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी त्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पेरुची बाग लावली. त्यांच्या पेरूच्या खास जातीने त्यांच्या आयुष्यात उत्पन्नाचा महापूर आणला आहे. एक एकर बागेत थाई पेरु जातीची सुमारे 400 झाडे लावली आहेत. यातून त्यांना वर्षातून दोनदा फळे येतात. एका झाडापासून एका वर्षात 50 ते 60 किलो पेरुचे उत्पादन मिळते. सुनील हे त्यांच्या एक एकर पेरुच्या बागेतून सुमारे 20 टन उत्पादन घेतात. ज्यातून त्यांना  किमान 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यामध्ये त्यांना एक लाख रुपयांपर्यंत देखभालीच्या स्वरूपात खर्च करावा लागतो. अशाप्रकारे त्यांना त्यांच्या 1 एकर शेतीतून एका वर्षात  निव्वळ 7 लाख रुपयांचा नफा मिळतो.


जंबो पेरुची खास व्यवस्था


सुनीलने पिकवलेल्या पेरुचा आकार इतका मोठा आहे की एकटा माणूस तो पूर्णपणे खाऊ शकत नाही. पेरु लिंबाच्या आकारापेक्षा लहान असतानाच निवडले जातात. नंतर त्यावर आवरण लावले जाते, जेणेकरून कोणत्याही नैसर्गिक आपत्ती पाऊस, वादळ, गारपीट इत्यादी रोगांचा परिणाम होऊ नये. तापमानाचा समतोल राखण्यासाठी धुके विरोधी पॉलिथिन आणि नंतर त्यावर कागद बांधला जातो, जेणेकरून पेरुवर कोणत्याही किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.


पेरू बागेचे आधुनिक व्यवस्थापन


काही वर्षांपूर्वी त्याने पेरुच्या एका खास जातीबद्दल ऐकले होते. तो पेरू पाहिल्यावर त्याला आश्चर्य वाटले कारण इतका सुंदर आणि मोठा पेरू पाहून त्याला मोह झाला. त्याने त्याची बाग लावण्याचा विचार केला. त्याचा कृती आराखडाही बनवायला सुरुवात केली. यानंतर सुनीलने थाई जातीची रोपे मागवली. आधुनिक तंत्राने आपल्या शेतात बागेची लागवड केली. जमिनीची पाण्याची पातळी खूपच खालावली असल्यानं ते ठिबक सिंचनाद्वारे सिंचन करतात.


सुनील कडेला अनेक प्रकारची फळे आणि भाज्या पिकवतात 


सुनील कडेला यांनी 2 एकरात लिंबाची शेती केली आहे. एका एकरात शेड नेट बसवले आहे. यामध्ये तो भाजीपाल्याची लागवड करतो. या जंबो पेरु आणि लिंबाच्या झाडांचे पोषण रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय पद्धतीने केले जाते. त्यामुळं ही आणखी आरोग्यदायी फळे आहेत. त्यांनी आपल्या पेरु आणि लिंबाच्या बागांमध्ये कडुलिंबाचा पाला, शेणखत घातले आहे. याशिवाय त्यांनी सेंद्रिय हळद, मनुका, सफरचंद याची देकील लागवड केली आहे. ते सेंद्रिय भाजीपालाही पिकवतात. याशिवाय ते स्वत: मधमाशी पालनाचे काम करतात. लिंबू फळांवर प्रक्रिया करण्याचे काम ते करत आहेत.


शेतातील टाकाऊ पदार्थापासून खते तयार 


पेरूचा दर्जा चांगला राहावा, त्याच्या उत्पादनाला जास्त मागणी राहावी यासाठी सुनील विशेष काळजी घेतात. यासाठी ते सेंद्रिय खते आणि कीटकनाशके वापरतात. शेतातील टाकाऊ पदार्थापासून तयार केली जातात. कीटकनाशक म्हणून फक्त कडुनिंबावर आधारित औषधे वापरतात. सुनील आपल्या शेतातून एकही कचरा बाहेर जाऊ देत नाही. झाडांची छाटणी आणि छाटणीच्या अवशेषांपासून कंपोस्ट खत तयार केला जातो. तो फक्त सेंद्रिय खतांचा वापर करतात. 


पेरुची ऑनलाईन मार्केटिंग


पेरुच्या बागा लावणाऱ्या सुनीलची कथा जितकी अनोखी आहे तितकीच त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजीही अधिक रंजक आहे. त्यांचे पेरु कोणत्याही भाजी मंडईत किंवा दुकानात विकत नाहीत, तर ते थेट ऑनलाइन रिटेलिंगद्वारे विकतात. सुनीलच्या ऑनलाईन मार्केटिंगची डिलिव्हरी साखळी दिल्ली, चंदीगड, पंचकुला, नोएडा, गुरुग्राम, गाझियाबादसह अनेक ठिकाणी विस्तारलेली आहे. तिथून लोक ऑर्डर देतात. ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर 8 तासात पेरुची डिलिव्हरी होते.


पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांसाठी सूचना


सुनील कंडेला म्हणाले की, पंजाब-हरियाणातील जमीन रासायनिक खतांमुळे नापीक होत आहे. दुसरीकडे भाताची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. ज्या दराने पाणी कमी होत आहे, त्या प्रमाणात शेतकरी जास्त काळ भातशेती करू शकत नाहीत. त्यामुळे इतर पर्याय शोधावे लागतील. तुम्हालाही कृषी अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणायचा असेल तर अशी नगदी शेती करण्याची गरज आहे. त्यावर प्रक्रिया करून तुम्ही बाजारातून दुप्पट नफा मिळवू शकता. यामुळे जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. सुनील कंडेला यांनी ज्या प्रकारे पेरूचे चांगले उत्पादन घेतले आहे. त्याची प्रतवारी, पॅकिंग आणि मार्केटिंग उत्तम प्रकारे केले आहे. ते इतर शेतकऱ्यांसाठी एक यशस्वी उदाहरण आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


शेतीसाठी वय नाही हिमंत लागते, YouTube चा व्हिडीओ पाहून ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग; 75 वर्षीय शेतकऱ्याची यशोगाथा