Success Story : आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं महिला काम करताना दिसत आहेत. देशाचं राजकारण असो किंवा कृषी क्षेत्र, सामाजिक, आर्थिक या सर्व क्षेत्रात महिला चांगल काम करताना दिसत आहेत. आज आपण हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. या महिलेनं इतर महिलांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. या महिला शेतकऱ्याने विविध प्रकारची पिकं घेऊन चांगला नफा मिळवत आहेत.
कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन
शिखा चौधरी या हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात राहणाऱ्या एक महिला शेतकरी आहेत. तसेच महिला कृषी-उद्योजक देखील आहे. त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने विविध प्रकारच्या पिकाची शेती केली आहे. तसेच त्याच्या विपणनाविषयी ज्ञान मिळवले आहे. यातून त्या चांगला नफा मिळवत आहेत. याचबरोबर शिखा चौधरी या गायत्री समुहाच्या माध्यमातून एका महिला बचत गटाचेही प्रतिनिधित्व करत आहे. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या होत्या. मंदीमुळं जिल्ह्यातील नोकरीच्या, रोजगाराच्या संधीही कमी झाल्या होत्या. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शिखा यांनी बचत गट सुरू केला.
शिखा चौधरी यांनी अनेक तयार उत्पादने घेतली आहेत
शिखा चौधरी यांच्या शेतात गहू, भात आणि भाजीपाल्याची शेती आहे. यासोबतच शिखा यांनी ऑयस्टर मशरूमची देखील लागवड केली आहे. 2016 मध्ये कृषी विज्ञान केंद्रानं आयोजित केलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमात वैज्ञानिक प्रक्रियेसह अन्न विपणन उत्पादनांच्या विविध गोष्टींची माहिती त्यांनी घेतली. यानंतर त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध उत्पादने घ्यायला सुरुवात केली. यामध्ये आंबा पावडर, त्रिफळा पावडर, शेवया, सेरा, शेपूबडी, दलिया, लोणचे इत्यादी उत्पादन तयार केली आहेत. शिखा चौधरी यांनी अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. 2017-18 च्या तुलनेत सध्या त्यांच्या गटाला 1 लाख 38 हजार रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: