Weight Loss Tips : आजच्या काळात सगळ्यांनाच फीट राहायचंय. यासाठी अनेकजण नियमित जिमला जातात. वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. मात्र, तरीही त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. अशा वेळी आम्ही तुमच्यासाठी काही खास घरगुती पेयांची नावं सांगणार आहोत. ज्याचं नियमित सेवन केल्याने तुम्हाला कोणत्याही डाएटिंगची गरज भासणार नाही आणि तुमचं वजनही (Weight Loss) झटपट कमी होईल. 


'ही' पद्धत वजन कमी करण्यासाठी फायदेशीर 


वजन कमी करण्यासाठी जीवनशैली बदलणे महत्त्वाचे आहे. यामध्ये तुम्ही सकाळी काय खाता आणि काय पिता हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सकाळच्या दिनचर्येचा तुमच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. यासाठी ही पेय तुमच्यासाठी...


कोमट लिंबू पाणी


TOI च्या रिपोर्टनुसार, सकाळी एक ग्लास कोमट लिंबू पाणी चयापचय जलद करण्यासाठी पुरेसे आहे. हे हायड्रेशन आणि व्हिटॅमिन सी प्रदान करते. हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमचे रक्षण करते.


ग्रीन टी 


ग्रीन टी अँटिऑक्सिडंट्सने भरलेली असते, ती EGCG नावाचे कॅटेचिन देखील पुरवते. जे तुमचे चयापचय वेगवान करण्याबरोबरच वजन कमी करण्यास मदत करते.


ब्लॅक कॉफी


ब्लॅक कॉफी हे कमी उष्मांक असलेले पेय आहे, जे कॅफीन आणि अँटिऑक्सिडंट्स प्रदान करते. कॅफिन चयापचय वाढवते आणि फॅट बर्न करण्यास चालना देते. तर अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करतात.


दालचिनी चहा


जर तुम्हाला सामान्य चहा पिण्याचा कंटाळा आला असेल तर दालचिनीचा चहा पिण्यास सुरुवात करा. हे रक्तातील साखर नियंत्रित करते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करते. हे प्यायल्याने पचनशक्ती वाढते आणि पोटाच्या समस्या दूर होतात. जे पोटाची चरबी कमी करण्यास देखील मदत करते.


कोरफडीचा रस


जर तुम्ही लठ्ठपणा, हाय बीपी, शुगर, कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीशी झुंज देत असाल तर सकाळी कोरफडीचा रस पिणे चांगले. या ज्यूसमुळे या सर्व समस्या दूर होतात.


सब्जाचे पाणी


वजन कमी करण्याबरोबरच प्रथिने घेणेही महत्त्वाचे आहे. सब्जाचे पाणी प्यायल्याने तुम्ही प्रथिने मिळवू शकता आणि ते फायबर आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड सारखे आवश्यक पोषक देखील प्रदान करते.


हळद आणि काळी मिरी पाणी


हळद आणि काळी मिरी आपल्या घरात सहज उपलब्ध असते. हळद कर्क्यूमिन प्रदान करते, जे जळजळ कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर काळी मिरी मेटाबॉलिज्म वाढवून फॅट बर्न करण्याचे काम करते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने वजन लवकर कमी होते.