Business Idea : कोणताही व्यवसाय करायचा म्हटले तर त्यामध्ये कमी गुंतवणूक करून जास्त फायदा कसा कमवात येईल याकडेच सर्वांचा कल असतो. कमी गुंतवणूक करून जास्त फायदा मिळवून देणारे अनेक व्यवसाय आहेत. फक्त त्याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. यातीलच मोती शेतीचा एक चांगला पर्याय आहे. या व्यवसायात फक्त 35 हजार रूपयांची गुंतवणूक करून तीन ते साडेतीन लाख रूपये कमवण्याची संधी आहे. महत्वाची बाब म्हणजे या व्यवसायासाठी सबसीडी देखील मिळत आहे. मोती शेतीसाठी ऑयस्टर खूप महत्वाचे आहे. दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगा येथील ऑयस्टरची गुणवत्ता उत्तम आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मोत्यांची शेती कशी करायची याचे प्रशिक्षण दिले जाते. 


मोत्याची शेती करण्यासाठी एका तलावाची आवश्यकता आहे. तलावात ऑयस्टर टाकावे लागतील. त्यासाठी थोड्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. तलाव खोदण्याासाठी सरकारकडून 50 टक्के सबसीडी देखील देण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून मोत्यांची शेती करण्याकडे अनेक जण वळले आहेत. या व्यवसायातून चांगला फायदा मिळत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे.  
 
ऑयस्टरपासून तयार होतात मोती


 ऑयस्टरपासून मोती तयार होतात. त्यासाठी प्रथम ऑयस्टर जाळ्यात बांधून दहा ते 15 दिवस तलावात सोडावे लागेल. जेणेकरून ते स्वतःचे वातावरण तयार करू शकतील.  त्यानंतर 15 दिवसांनी तलावात टाकलेले ऑयस्टर काढून ते साच्यामध्ये टाकावे लागतील. त्यावर कोटींग नंतर ऑयस्टर थर तयार करतील. साच्यावर तयार झालेले हे थर नंतर मोती तयार करतील. 


असा होतो फायदा
एक ऑयस्टर तयार होण्यासाठी 25 ते 35 रूपये खर्च येतो. प्रत्येक ऑयस्टरपासून दोन मोती तयार होतात. एका मोत्याची किंमत जवळपास दीडशे ते दोनशे रूपये आहे. एका छोट्याशा तलावात एक हजार ऑयस्टर टाकले तर त्यापासून दोन हजार मोती मिळतील. परंतु, सर्वच ऑयस्टर जिवंत राहतील असे नाही. त्यातील किमान 600 ते 700 ऑयस्टर वाचले तर 1200 ते 1400 मोती मिळतील. हे मोती कमीत कमी दोन ते तीन लाख रूपयांना विकले जातील. एक हजार मोत्यांसाठी 25 ते 35 हजार रूपये खर्च येईल. तर उत्पादन दोन ते तीन लाखांच्या आसपास मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व फक्त एका महिन्यात होणार आहे. त्यामुळे 35 हजार रूपये गुंतवणूक करून महिन्याला दोन लाख रूपये जरी मिळाले तरी हा व्यवसाय खूप चांगला चालू शकतो.


महत्वाच्या बातम्या 


Rice Farming : आता पुराच्या पाण्यातही वाचणार भाताचं पीक, जाणून घ्या 'सह्याद्री पंचमुखी' वाणाबद्दल