Yavatmal Farmers News : हवामान विभागानं यावर्षी वेळेपूर्वीच मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळं शेतकरी मृग नक्षत्राच्या पेरणीला लागले होते. पाऊस पडण्याच्या आधीच 20 हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी धूळ पेरणी आटोपली होती. मात्र, आता शेतकऱ्यांना पावसाची नितांत आवश्यकता आहे. आता पाऊस लांबल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळं धूळ पेरणी उलटण्याचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागानं नियोजन केलं आहे.


यवतामळ जिल्ह्यात जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्यादृष्टीनं कृषी विभागाने नियोजन केले. मात्र, अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. याच स्थितीत काही शेतकऱ्यांनी मोठी रिस्क स्वीकारून कपाशीची लागवड केली. तब्बल 20हजार हेक्टरवरील धूळ पेरणी झाली आहे. आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस सतत हुलकावणी देत आहे.




गतवर्षी हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. काही शेतकऱ्यांनी एकरी उत्पन्न वाढावे म्हणून लवकर टोबणी केली. काहींनी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी धावपळ केली. ही संपूर्ण घाई शेतकऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच खरिपाची पेरणी करावी. अधिक घाई झाली, तर त्याचा विपरित परिणाम होईल. शेतकऱ्यांनि पाऊस बरसल्यानंतरच पेरणी करावी. असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.




धूळ पेरणी केली, त्यानंतर बी अंकुरले, मात्र, त्यानंतर पाऊस न झाल्यामुळं धूळ पेरणी वाया गेली. त्यामुळं शासनानं तत्काळ धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करावं. तसेच त्यांनी दुबार पेरणीसाठी तत्काळ मदत करावी हीच आमची शासनाला विनंती असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. गेल्या 24 तासात मुंबई ठाणे आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.  राज्यातही हलका ते मध्यम पाऊस पडला असून, दक्षिण कोकणात थोडा जास्त पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात सगळीकडं मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असल्याचं मत भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.


महत्वाच्या बातम्या: