Devendra Bhuyar on Sanjay Raut : माझा मतदानाचा अधिकार संजय राऊत यांना द्यावा, असा खोचक टोला आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी लगावला आहे. विधानपरिषदेचं मत देताना संजय राऊतांनी माझ्यासोबत राहावं असंही भुयार यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांनीचं प्रथम आम्हाला टार्गेट केलं. मी लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीसोबत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये देखील मी महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचं भुयार यांनी सांगितलं. महाविकास आघाडी प्रचंड भ्रमात असल्याचेही भुयार यावेळी म्हणाले. 


गुप्त मतदान केल्यामुळेच आमच्यावर आक्षेप


राज्यसभेत शिवसेना उमेदवार संजय राऊत यांचा पराभव झाल्यानंतर संजय राऊतांनी पराभवाचं खापर अफक्ष आमदारांवर फोडलं होते. तसेच त्या आमदारांची नावं देखील घेतली होती. यावेळी देवेंद्र भुयार यांचे नाव देखील राऊतांनी घेतलं होते. त्यानंतर भुयार यांनी आपली भूमिका मांडली होती. आपण महाविकास आघाडीलाचा मतदान केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. गुप्त मतदान केल्यामुळेच आमच्यावर आक्षेप घण्यात आला. उद्या मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलं आहे. त्यांची उद्या मी भेट घेणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत मी एक मुद्दा मांडणार आहे. तो म्हणजे आम्ही मतदान देतो पण मतदान दिल्याचा पुरावा आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही. मग अशावेळी तुम्ही मान्य कसं कराल? याच्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे संजय राऊतांना मतदानाच्या टेबलच्या समोर उभं करा, मी त्यांना मतदान दाखवतो. जर असे होत नसेल तर निवडणूक आयोगानं विशेष बाब म्हणून आम्हाला परवानगी द्यावी असे भुयार म्हणाले.


 महाविकास आघाडीसोबत दोन प्रस्ताव ठेवतो


मी महाविकास आघाडीच्या बैठकीत दोन प्रस्ताव ठेवणार आहे. एक म्हणजे मी मतादान करातान संजय राऊतांना माझ्या मतपेटीजवळ उभं करा, दुसरं म्हणजे माझं मतदान त्यांनाचं करु द्या असे भुयार यावेळी म्हणाले. महाविकास आघाडी प्रचंड भ्रमात आहे. त्यांचा भ्रमाचा भोपळा राज्यसभेत फुटला आहे. दुसरा सुद्धा भोपळा फुटू शकतो असे भुयार म्हणाले. त्यामुळं महाविकास आघाडीनं गैरसमज करुन न घेता सर्वांना सोबत घेऊन अपक्ष असतील दुसऱ्या पक्षांचे आमदार असतील त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. मतदारसंघातील प्रश्नावर आघाडी सरकारनं मार्ग काढावा. मार्ग काढल्यास ते आमदार महाविकास आघाडीसोबत राहतील असे भुयार म्हणाले.


महत्वाच्या बातम्या: