Soil Health Card : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. कृषी क्षेत्राला (agricultural sector) अर्थव्यवस्थेचा कणा म्हटलं जातं. त्यामुळं प्रत्येक राज्य कृषी क्षेत्र मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असतात. शेतकरी (Farmers) देखील उत्पादन वाढवण्यासाठी शेतीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर (Use of chemical fertilizers) करतात. मात्र, वाढता रासायनिक खतांचा वापर ही चिंतेची बाब आहे. कारण जमिनीतील मातीच्या आरोग्याबाबतची (Soil Health) धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेशमधील तज्ज्ञांनी याबाबत परिक्षण केलं आहे. यानुसार पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हिमाचल प्रदेशमधील (Himacha Pradesh) 20 टक्के उत्पादन घटले आहे. 


 हिमाचल प्रदेशमधील फलोत्पादन आणि वनीकरण विद्यापीठ, नौनी येथील तज्ज्ञांनी जमिनीतील मातीचे परिक्षण केलं आहे. अभ्यासाचे निष्कर्ष आश्चर्यकारक होते. राज्यातील जमिनीत पोषक तत्वांच्या कमतरतेमुळं सुमारे 20 टक्के उत्पादन घटलं आहे. जमिनीच्या चांगल्या आरोग्यासाठी 16 पोषक तत्वे आवश्यक आहेत. यापैकी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन वातावरणात आणि पाण्यात मिसळले जातात. बाकीचे घटक जमिनीतच आहेत. मात्र, सध्या मातीची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे दिसत आहे. पोषक तत्वांची कमतरता झाल्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.


खतांचा वापर वापर, उत्पादन क्षमता कमी 


गेल्या अनेक वर्षांत खतांचा वापर झपाट्यानं वाढल्याचे तज्ज्ञांच्या तपासणीत उघड झाले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 1969 एक हेक्टर जमिनीसाठी 12.4 किलो खताचा वापर केला जात होता. आता याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण वाढून हेक्टरी 137 किलो झाले आहे. शेतकरी शेतात मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करत आहेत. त्यामुळं जमिनीतील नायट्रोजन, पोटॅश, सल्फर, झिंक, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मॅंगनीज, तांबे आणि क्लोरीन या घटकांची कमतरता होत आहे. त्यामुळं जमिनीचा दर्जा घसरत आहे.  अभ्यासानुसार,  सुमारे 85 टक्के मातीमध्ये सेंद्रिय कार्बनची (खत) कमतरता आहे. जमिनीतही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे.


शेतकऱ्यांनी लावडीपूर्वी मातीचं परिक्षण करावं


दरम्यान, विद्यापीठाकडून राज्याच्या विविध भागात माती परीक्षण केले आहे. त्यानुसार जमिनीतील पोषक तत्वांची दरवर्षी घट होत असल्याचे समोर आले. झिंक अनेक रोगांना प्रतिबंध करते. मात्र, आता जमिनीत झिंकचे प्रमाण फारच कमी झाले आहे. याच्या कमतरतेमुळे भात, गहू, बटाटा, मका, कोबी, सफरचंद आदी पिकांवर करपा  आणि खैरा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. झिंक, लोह, तांबे, मॅंगनीज, बोरॉन, क्लोरीन हे वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त घटक आहेत. त्याच्या कमतरतेमुळं झाडांची वाढ योग्य प्रकारे होत नाही. पिकांमध्येही बोरॉनची कमतरता दिसून आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पिकांची लागवड करण्यापूर्वी आपल्या शेतातील मातीचं परिक्षण करणं गरजेचं असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या:


बेसुमार माती उपशाने नदीकाठ खचला, सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन मंडल अधिकाऱ्यांसह एका तलाठी निलंबित