Snail Attack on Soybean : राज्यात एकीकडं काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसरीकडं सोयाबीनच्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर गोगलगायींचा प्रादुर्भाव (Snail Attack on Soybean) होताना दिसत आहे. या गोगलयागींच्या प्रादुर्भावामुळं शेतकरी संतप्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा पिकांवर प्रादुर्भाव केलेल्या गोगलयींमुळं चिंतेत आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी रेणापूर तहसील कार्यालयात गोगालगायी आणल्याचा प्रकार घडला आहे.
बळीराजा संकटात
मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेतलं जातं. लातूर जिल्हा हा तर कायमच सोयाबीन पिकासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे. मात्र, गोगलगायींचा प्रादुर्भावा आता एवढा वाढला आहे की, संपूर्ण सोयाबीन पिक फस्त करणार का? अशी भीती निर्माण झाली आहे. यावर काय उपाय करावा हेच लक्षात येत नसल्यामुळं बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळं संतप्त झालेल्या रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात गोगालगाय आणून सोडल्या आहेत. गोगलगायी सोयाबीनचे पीक फस्त करत आहेत. फक्त सोयाबीन नाहीतर भाजीपाला पिकावर देखील या गोगलगायीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. काही ठिकाणी यावर उपाययोजना म्हणून महागडी औषध देखील फवारली जात आहेत. मात्र याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळं पिकं वाया जाण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्ह्यात यावर्षी सगळ्याच तालुक्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. सततच्या पावसानं पिकं पिवळी पडत चालली आहेत. त्यातच जिल्ह्यातील अनेक भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळं शेतकरी हैराण झाले आहेत. रेणापूर तालुक्यात सततच्या पावसामुळं आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन मदत द्या, अशी मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान, स्वतःची कैफियत सरकार दरबारी लक्षात आणून, देण्यासाठी काही शेतकऱ्यांनी गोगलगायी एका पिशवीत भरुन रेणापूर तहसील कार्यालयात आणल्या होत्या. या सर्व गोगलगायी कार्यालय परिसरात टाकण्यात आल्या आहेत. सतत होणारा पाऊस त्यात गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे हातात आलेले पिके वाया जातील. यावर कृषी विभागानं आणि प्रशासनानं तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: