Sharad Pawar : द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape Farmers) हा अतिशय कष्टाळू आहे. त्यामुळं त्याचं जीवनमान सुधारायला हवं असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Ncp Sharad Pawar) यांनी केलं. अतिवृष्टीमुळं पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना (Farmers) या संकटातून बाहेर काढावं लागेल. राज्य सरकारनं द्राक्ष पिकाचं नुकसान झाल्यावर कमीत कमी 50 टक्के अनुदान देण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वार्षिक चर्चासत्र आणि द्राक्ष परिषद MRDBS अंतर्गत आयोजित केलेल्या अधिवेशनात पवार बोलत होते.


द्राक्ष पिकासंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी संस्थेचा उदय 


महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या कष्टाला आणि संघटनेला तोड नाही. 1960 साली बारामतीत या संघटनेचा जन्म झाला. काही ठराविक लोक एकत्र येतात याची स्थापना करण्यात आली. अनेक लोक अनेक संस्थेत काम करत होते. द्राक्ष संबंधित पिकाच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी या संस्थेचा उदय झाला असल्याचे पवार म्हणाले. राज्यातील अनेक ठिकाणांहून लोक एकत्र आले. 35 हजार हून अधिक शेतकरी या संघटनेचे सभासद असल्याचे पवार म्हणाले. 


संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटना महत्त्वाची


केंद्र आणि राज्य शासनाचे धोरण आणि संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटना ही संस्था महत्वाची आहे. राज्यात आणि देशात अनेक पिकांच्या संघटना आहेत. उत्तरेकडे सफरचंद पिकाची संघटना आहे. दक्षिणेत नारळाची संघटना आहे. शेतीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी देखील अनेक संघटना अनेक राज्यात आहेत. पण मला सांगताना आनंद होतो की, आपली एकमेव संघटना आहे की आपण 60 वर्षांपासून भेटत आहोत. संशोधनासाठी आपली संघटना सतत जागरुक असते. तुम्ही हे टिकवून ठेवलं असल्याचे शरद पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी द्राक्ष प्रदर्शनाची पाहणी केली. त्यानंतर द्राक्ष बागायतदारांना मार्गदर्शन केले. 


द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही अनुदान मिळालं पाहिजे


द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही अनुदान मिळालं पाहिजे, यासाठी राज्य सरकारने आढावा घेतला पाहिजे. एकूण क्षेत्र किती आणि पीक किती आहे याची सरकारने नोंद घेणे आवश्यक आहे. त्या नोंदीमुळं अनेक कामांना मार्ग मोकळा होईल. पावसाने या पिकांचे नुकसान होतं त्याचा सुद्धा सरकारनं आढावा घेतला पाहिजे असे शरद पवार म्हणाले. अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावं लागेल असे शरद पवार म्हणाले. राज्य सरकारनं द्राक्ष पिकाचं नुकसान झाल्यावर कमीत कमी 50 टक्के अनुदान देण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik News : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक, नाशिक ग्रामीण पोलिसांनी व्यापाऱ्यांना धडा शिकवला, नेमकं काय झालं?