Sangli Grapes Union : द्राक्ष, बेदाणा विक्रीचे दर निश्‍चित करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्यातक्षम द्राक्षांना प्रति किलो किमान 85 रुपये तर स्थानिकसाठी 55 रुपये दर निश्‍चित करण्यात आला आहे. निश्चित दराच्या खाली कुणीही विक्री करणार नाही, अशा ऐतिहासिक ठरावाची घोषणा या बैठकीत करण्यात आली आहे. 


निर्यातक्षम द्राक्षांना प्रति किलो किमान 85 रुपये तर स्थानिक विक्रीच्या द्राक्षांना सरासरी 55 रुपये असा आधारभूत दर द्राक्ष बागायतदार संघाने जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार बागायतदार संघाच्या सांगली विभागातर्फे चालू हंगामात उत्पादन खर्चावर आधारित द्राक्ष, बेदाण्याचे किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी  उत्पादकांची  बैठकीचे आयोजन सांगलीत करण्यात आलं होतं . या बैठकीत प्रथमच अशा पद्धतीने  निर्यातीच्या द्राक्षांच्या आणि बेदाण्याच्या आधारभूत किमती जाहीर करण्यात आले आहेत. या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दबाव गट तयार करण्यात आला. द्राक्ष हंगामात येणारा उत्पादन खर्च आणि इतर खर्च याचा विचार करून जानेवारी ते एप्रिल महिन्यांचे प्रत्येक आठवड्यासाठी आणि द्राक्षमालाच्या वातावरणानुसार, तपशीलनिहाय दर निश्चित करण्यात आले. गेल्या पाच ते सात वर्षांतील खर्च आणि नैसर्गिक संकटे याचा वस्तूनिष्ठ अभ्यास करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळी आपली मते मांडली. यावेळी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष, बेदाणा विक्रीचे दर निश्‍चित  करण्यात आले.


महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार बागायतदार संघाच्या सांगली विभागातर्फे चालू हंगामात उत्पादन खर्चावर आधारित द्राक्ष, बेदाण्याचे किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी उत्पादकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीत दर्जेदार बेदाणा तयार केला जातो. बेदाणा विक्रीसाठी बाजापेठा शोधण्याची आवश्यकता आहे. तरच बेदाणा उत्पादकांच्या समस्या सुटतील. त्यासाठी रेझीन बोर्ड स्थापन करण्याचा विचार संघ करत आहे. त्याचा प्रस्ताव तयार करून संबधित विभागाकडे दिला जाणार आहे. त्यासाठी सांगलीतील बेदाणा उत्पादन शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत द्राक्ष संघाकडून बैठकीत व्यक्त केला गेला. 


द्राक्ष उत्पादन खर्चावर आधारित 10 टक्के नफा मिळवा, हा धागा पकडून निर्यातीच्या सर्व बाजारांसाठी दरासंबधी बागायातदारांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उत्पादन खर्च व त्यावर नफा गृहीत धरून हंगामात 35 ते 55 रुपये प्रतिकिलो तर बेदाण्याला प्रतवारीनुसार 80 ते 250 रुपये प्रतिकिलो असा दर निश्‍चित करण्यात आला आहे. पुणे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी होते. विविध वाण, रंग, आकार, गुणवत्ता यांचा विचार करून या निश्‍चित दरापेक्षा अधिक दरानेच विक्री करण्यात यावी, असा सर्वानुमते निर्णय झाला. या निश्‍चित दराच्या केलेल्या किमान दराच्या खाली कुणीही विक्री करणार नाही, हा ऐतिहासिक ठरावाची घोषणा यावेळी करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनिल पवार, सांगली विभागीय अध्यक्ष संजय बरगाले, ज्येष्ठ संचालक शिवलिंग संख, सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, प्रशांत देखमुख, भारत शिंदे, रवींद्र निमसे, बाळासाहेब गडाख,मानद सचिव प्रफुल पाटील उपस्थित होते. 


वाईन आणि ज्यूस उद्योगात उतरण्याची गरज


सांगली जिल्ह्यात बेदाणा 28 देशात द्राक्ष, बेदाणा निर्यात होते. त्यामध्ये 74 टक्के द्राक्ष तयार होतात. 24 टक्के बेदाणा निर्मिती होते. तर दोन टक्के द्राक्षापासून वाईन आणि ज्यूस होतो. त्यामुळे आता आपल्याला वाईन आणि ज्यूस उद्योगात उतरावे लागेल, असं मत काही द्राक्ष बागायतदारांनी व्यक्त केलं आहे. तसेच द्राक्ष उत्पादनाच्या 93 टक्के विक्री भारतात होते तर सात टक्के द्राक्ष निर्यात होते. बांगलादेशात प्रति किलोला 50 रुपये ते 65 रुपये असं शुल्क भरावं लागत आहे. त्यामुळे शासनाकडे कमी करण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघ पाठपुरावा  करणार आहे. तसेच  निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या एका कंटेनरचे भाडे नऊ हजार डॉलर इतके आहे. हे भाडं कमी करण्यासाठी देखील द्राक्ष बागायतदार संघाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. 


द्राक्ष बागायतदार संघानं निश्चित केलेले दर


द्राक्ष वाणानुसार दर ( प्रतिकिलो)
निर्यात : 85 


लोकल 
सुपर सोनाका : 50 
आरके, अनुष्का, एसएसएन-प्रत्येकी 55
माणिकचमन : 40, थॉमसन : 35


बेदाणा ( प्रतवारीनुसार, किलोत)



  • लक्झरी माल : 250

  • माल नंबर 1 : 200

  • माल नंबर 2 ( डागी) : 140

  • माल नंबर तीन (काळा) : 80


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह