कोल्हापूर : कोल्हापूरमधील कळंबा कारागृहात (Kolhapur Kalamba Jail) सातत्यानं काही ना काही घडत असतं. आता कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेत एका कैद्याचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. निशिकांत बाबुराव कांबळे असं हाणामारीत मृत्यू झालेल्या कैद्याचं नाव आहे. मारहाण करणाऱ्या चार कैद्यांवर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार निशिकांत आणि चार कैद्यांमधील वाद वाढला आणि हाणामारी सुरू झाली.  हाणामारीत निशिकांतला बेदम मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.








या प्रकरणी कळंबा कारागृह प्रशासनाने चार कैद्यांविरोधात रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.निशिकांत कांबळे कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. कळंबा कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर कांबळेवर हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निशिकांत कांबळे आणि त्याच्या तीन साथीदारांनी 2003 साली एकाची हत्या केली होती. या प्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कांबळे यांचे वर्तन बिघडत होते. तो अन्य कैद्यांशी गैरवर्तणूक करत असायचा अशी माहिती मिळाली आहे. 

 

काहीवेळा हातात असलेली कोणतीही वस्तू इतर कैद्यांवर फेकण्याचा प्रयत्न तो करत असे. त्यामुळे कारागृहात अनेकवेळा गोंधळ उडाला होता. यावेळी हमरीतुमरी होऊन हाणामारीला सुरुवात झाली. इतर कैद्यांनी निशिकांत समजावण्याचा प्रयत्न केला मात्र निशिकांतने चारही कैद्यांना शिवीगाळ करून तुम्हाला जिवंत सोडणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर संतप्त झालेल्या चौघांमध्ये आणि निशिकांत यांच्यात हाणामारीला सुरुवात झाली.

 

या हाणामारीत निशिकांत रक्तदाब कमी झाला त्याची प्रकृती गंभीर बनत गेली. कळंबा प्रशासनाने त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी निशिकांत याला हृदयविकाराचा झटका आल्याचे बरॅकमधून सांगण्यात येत होते. मात्र कारागृह अधीक्षक यांनी कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये चौघा कैद्यांनी निशिकांत मला बेदम मारहाण केल्याचे स्पष्ट दिसून आले. त्याच्यानंतर मारहाण करणाऱ्या चार कैद्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.







कळंबा जेल नेहमीच चर्चेत
कोल्हापुरातील कळंबा जेल नेहमीच चर्चेत असतं. जेलमध्ये याआधी क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने कळंबा कारागृहात गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून तीन टेनिसबॉलमधून 15 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. त्याआधी कारागृह पोलिसाच्या बुटाच्या बॉक्समध्ये दोन चिठ्ठ्यांमधून कैद्यांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी केली असल्याचे समोर आले होते.   कधी या कारागृहामध्ये मोबाईल, सिम कार्ड, चार्जर इतकंच काय पण गांजा देखील सापडल्याचे समोर आले होते.  


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह 




 




इतर महत्वाच्या बातम्या


बॉलमधून जेलमधील कैद्याला गांजा! कोल्हापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळं प्रयत्न फसला, तिघे अटकेत