Pradhan Mantri Pik Vima Scheme : शेतकऱ्यांकरता देशात कायमच नवनविन योजना राबवल्या जातात आणि यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना. याअंतर्गत पाऊस, दुष्काळ किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट झाल्यास त्यांना आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळेच या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा काढण्याचे आवाहन सरकार करत आहे. या योजनेची शेवटची तारीख 31 जुलै होती मात्र आता ती वाढवण्यात आली आहे. 


कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येऊ शकतो.


अर्ज करण्याची तारीख 31 जुलै होती. मात्र आता शेतकऱ्यांना 16 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी शेतकरी आॅनलाईन अर्ज भरू शकतात. तुम्ही तुमच्या फोनवरून तसेच लॅपटाॅपवरून अर्ज भरू शकता. नोंदणीसाठी, तुम्हाला www.pmfby.gov.in वेबसाइटला भेट देऊन स्टेप बाय स्टेप प्रोसेस फाॅलो करून हा अर्ज भरू शकता. 


खरीप हंगामातील 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार 


खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा अशा एकूण 14 अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल, मंडळ, क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. 


प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे उद्देश


- शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.


- शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.


- आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांची शेतीमध्ये रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.


- शेताचे नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेची सरुवात करण्यात आली आहे.


- शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.


या योजनेचा लाभ कसा मिळवायचा?


जर तुमचे पीक कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट झाले असेल, तर तुम्हाला किसान पीक विमा अॅपद्वारे 72 तासांच्या आत त्याची माहिती द्यावी लागेल.  विमा कंपन्यांच्या फोन नंबरवर कॉल करूनही तुम्ही तुमच्या वाया गेलेल्या पिकाची माहिती देऊ शकता. हे केल्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाते आणि त्यानंतर प्रक्रिया सुरू होते. 


इतर महत्वाच्या बातम्या


Earthquake : उत्तर भारत हादरलं..दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के; 5.8 तीव्रतेचा भूकंप