PM Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6,000 रुपये डीबीटीद्वारे वर्ग केले जात आहेत. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्त्यांमध्ये 2,000 रुपये ट्रान्सफर मिळाले असून शेतकरी 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पीएम किसान योजनेशी संबंधित प्रत्येक लाभार्थी शेतकरी बांधव 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. हे पैसे खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना काही गोष्टींची पूर्तता करवी लागणार आहे.
PM Kisan Yojana : जमिनीच्या नोंदी तपासा
जर तुम्ही अद्याप जमिनीच्या नोंदींची पडताळणी केली नसेल तर ते काम लवकर पूर्ण करून घ्या. जमिनीच्या नोंदीची पडताळणी केली नाही तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता. त्यामुळेच तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन हे काम पूर्ण करून घ्या.
PM Kisan Yojana : बनावट शेतकरी योजनेतून बाहेर
या योजनेत ज्या लोकांनी आतापर्यंत फसव्या पद्धतीने लाभ घेतला आहे. या लोकांची नावे त्या-त्या राज्यांनी जाहीर केली आहेत. आता त्या लोकांकडून पैसे परत घेतले जात आहेत. यावेळी त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत. तसेच मागील हप्त्याचे पैसे त्यांना सरकारला परत करावे लागणार आहेत. या योजनेचा फसव्या मार्गाने लाभ घेणारे अनेकजण होते. याला आळा घालण्यासाठी शासनाने जमिनीच्या नोंदींची पडताळणी करणे बंधनकारक केले आहे.
PM Kisan Yojana : ई-केवायसी करणे आवश्यक आहे
तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही ई-केवायसी केली पाहिजे. असे न केल्यास 13 व्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात. प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊन किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ई-केवायसी करू शकता.
PM Kisan Yojana : अशी करा ऑनलाइन ई-केवायसी
आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँकेशी लिंक केलेला नाही. यामुळेच हजारो शेतकऱ्यांचे पैसे अजूनही अडकले आहेत. ही प्रक्रिया खूप सोपी आहे.
सर्वप्रथम pmkisan.gov.in वर जा.
होम पेजवर फार्मर्स कॉर्नरच्या विभागात e-KYC चा पर्याय निवडा.
नवीन पेज उघडताच आधार कार्ड क्रमांक टाका.
आता शेतकऱ्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.
साइटवर ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ई-केवायसी करून घ्या.
महत्वाच्या बातम्या
Aurangabad: लग्नातील फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे शेजारच्या शेतातील उभा ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान