Agriculture Success Story: पारंपरिक शेतीपिकांच्या मागे न लागता एकरभरात ड्रॅगनफ्रूटची लागवड(Dragon Fruit) करत मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील (Parbhani) कंधार तालुक्यातील शेतकरी मालामाल झालाय. ड्रॅगन शेतीतून या शेतकऱ्याला ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असून यंदाचा हंगाम ड्रॅगनफ्रूटमुळे चांगला जाणार असल्याचं दिसतंय.
राज्यात ड्रॅगनफ्रुट शेतीला चांगले दिवस आले असून चीनमधलं हे फळ आता मराठवाड्यासारख्या कमी पाणी असलेल्या जमिनीत मुळ धरू लागलंय. इथल्या शेतकऱ्यांनी या फळाला आता स्विकारला असून जिल्ह्यातील अनेकांनी पारंपरिक पिकासोबत एखााद्या एकरात ड्रॅगनफ्रूट लागवड सुरु केलेली दिसते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पैसे मिळणार
परभणी जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बारूळ या गावातील शेतकऱ्यांने 1 एकरामध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. गेल्या वर्षाचीचा तुलनेत या बागेतून या वेळेला दिडटनचे उत्पन्न मिळाले आहे. या शेतकऱ्याने पिकवलेल्या ड्रॅगनफळाच्या शेतीला भरपूर फळी लागली आहेत. ड्रॅगनफ्रूला बाजारभावही चांगला मिळणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
होलसेल मार्केटमध्ये सरासरी भाव कसा मिळेल?
होलसेल मार्केटमध्ये सरासरी 150 रुपयांचा भाव त्यांना मिळत आहे या हंगामातून आठ ते दहा टन उत्पन्न मिळणार असून बाजार भाव प्रमाणे चार ते पाच लाख उत्पन्न मिळणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. परिसरातील अनेक शेतकरी सध्या या ड्रॅगन शेतीला भेट देऊन माहिती जाणून घेत आहेत. तीन युवकांनी राबवलेल्या या प्रयोगामुळे ड्रॅगन शेती परिसरात करणे शक्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्या प्रयोगामुळे इतर युवा शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळत आहे. यामुळे रोज अनेक शेतकरी त्यांचा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत.
यंदाच्या बजेटमध्ये शेती क्षेत्राला अधिक प्राधान्य
सर्वप्रथम मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून दिल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशवासीयांचे आभार मानले. गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाजघटकांवर आपण लक्ष केंद्रीत करायला हवं. अंतरिम अर्थसंकल्पात आपण तेच केले असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात 9 घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा आदींचा समावेश असून मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या.
हेही वाचा: