Sweetpotato Farming Success: बेभरवशी उत्पन्न, हवामानात होणारे टोकाचे बदल आणि पिकाला अत्यल्प मिळणारा भाव अशा अनेक आव्हानांना तोंड देणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचा आता पारंपरिक पिकन ऐवजी नगदी, फळबाग किंवा प्रयोगशील पिकांचा आधार घेत अधिक उत्पन्न कमावण्याकडे कल दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या एका शेतकऱ्याने केवळ दीड एकरामध्ये रताळ्याचे उत्पादन घेऊन लाखोंचा नफा कमावलाय. या शेतकऱ्यांना पारंपारिक शेती आता सोडून दिली आहे . पारंपरिक पिकाच्या तुलनेत नगदी पिकातून चौकटीने उत्पन्न हा शेतकरी मिळवतोय. (Success Story)
पंढरपूरच्या बाबुळगावच्या सुधीर चव्हाण या शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला फाटा मारत नगदी पिकं घ्यायला सुरुवात केली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रताळ्याच्या लागवडीचा खर्च प्रति एकर सुमारे 5000 रुपये आहे पण त्यातून मिळणार उत्पन्न हे लाखोंमध्ये असल्याचे सुधीर सांगतात. गेल्या वर्षी सुधीर चव्हाण यांनी 1.5 एकरात रताळ्याचे उत्पादन घेतलं. 600 पोती रताळ्याच्या उत्पादनातून तीन लाख रुपयांचे उत्पन्न सुधीर चव्हाण यांनी मिळवलं आहे. (Pandharpur)
कशी केली रताळ्याची शेती?
सुधीर चव्हाण यांनी सांगितलं, 50 गुंठे क्षेत्रात रताळे चांगले येतात. लागवड करण्यापूर्वी नांगरणी करून नंतर रोटावेटरने माती दोन-तीन वेळा नांगरल्यानंतर रताळ्याची रोपे लावतात. लागवडीपासून 120 ते 130 दिवसात ही रोपे तयार होतात. जेव्हा झाडांवरची पाने पिवळी पडतात तेव्हा कंद खोदले जातात. रताळ्याच्या चांगल्या जातीची पेरणी केल्याने चांगलं उत्पन्न मिळतं.
रताळ्याच्या कोणत्या जाती चांगल्या?
सध्या शेतकरी वर्षा, श्री नंदिनी, श्रीरत्न, श्री वर्धिनी, राजेंद्र रताळे 5, पुसा पांढरा, पुसा सूनहरी यासारख्या सुधारित रताळ्याच्या जाती वापरून अधिक चांगला भाव मिळतोय. रताळ्याच्या लागवडीसाठी जास्त पाणी किंवा खताची ही आवश्यकता नाही. या पिकाला अधिक काळजीची गरज नाही. हिवाळ्याच्या हंगामात बाजारपेठेतही रताळ्याला चांगली मागणी असते त्यामुळे पिकाला भावही चांगला मिळतो. असं सुधीर चव्हाण सांगतात.
देशात कुठे कुठे होतं रताळ्याचे उत्पादन?
रताळ्याचा जगभरातला प्रवास हा साहस योगायोगाने मानवी कुतूहलाचीच गोष्ट आहे. नवनवे प्रदेश शोधताना खलाशांनी समुद्री प्रवासात अन्नाचा विश्वासार्ह स्त्रोत म्हणून या पिकाची क्षमता ओळखली आणि ज्या प्रदेशात हे पीक गेलं तिथे या पिकाने तग धरला. भारतात उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र पश्चिम बंगाल आणि ओडिसा मध्ये सर्वाधिक रताळ्याची लागवड केली जाते. हे बारमाही पीक असल्याचे तज्ञ सांगतात परंतु उन्हाळा आणि पावसाळा या पिकाच्या उत्पादनासाठी चांगला असतो.
हेही वाचा: