Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी अजित पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करणार आहेत. परतीच्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात आहेत. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणी आज अजित पवार करणार आहेत.


परतीच्या पावसाचा मोठा फटका


सध्या राज्यात परतीच्या पावसावनं थैमान घातलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात हा परतीचा पाऊस कोसळत आहे. या परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्यात आहेत. सध्या रब्बी पिकं काढणील आली आहेत.  सोयाबीन, कापूस या पिकांची काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनची काढणी झाली आहे. अशातच गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीतून कशीबशी वाचलेली पिकं परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या परतीच्या पावसानं हिरावून घेतला आहे. त्यामुळ अशा स्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला देण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, या नुकसानीमुळं मराठवाडा आणि विदर्भातील काही शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचल्याची घटना देखील घडल्या आहेत.


स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं केलं


पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक भागात पाणी शिरलं होतं. तसेच वाहतुकीवही मोठा परिणाम झाला होता. याच मुद्यावरुन अजित पवार यांनी भाजपवर टीका देखील केली होती. स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करुन ठेवलं असल्याचे अजित पवार म्हणाले होते. भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येत असल्याचेही ते म्हणाले होते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला 'अव्यवस्थेची' कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील. तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन अजित पवार यांनी केले होते. 


महत्त्वाच्या बातम्या:


Marathwada: मराठवाड्यात एकाचवेळी तीन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, दोन महिला शेतकऱ्यांचा समावेश