Vijay Verma : 'डार्लिंग्स','जाने जां','गली बॉय' आणि 'लस्ट स्टोरीज' सारख्या अनेक सिनेमे आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता विजय वर्मा (Vijay Verma) सध्या चर्चेत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आज तो एक यशस्वी अभिनेता असला तरी इथपर्यंतचा त्याचा प्रवास खूप कठीण होता. खिशात फक्त पंधरा रुपये असताना सुरू केलेला प्रवास आज त्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आहे.
विजय वर्माने Galatta Plusला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरबद्दल भाष्य केलं आहे. त्यावेळी त्याने आपल्या संघर्षाबद्दल भाष्य केलं. विजय म्हणाला,"मााझा आजपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण मिळालेलं काम योग्य पद्धतीने करण्यावर मी भर दिला. पात्रांना पूर्णपणे न्याय दिला. करिअरच्या एका टप्प्यावर माझ्या खिशात फक्त 18 रुपये होते".
'ती' भूमिका मिळाली अन्...
विजय वर्मा संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलताना पुढे म्हणाला,"ज्यावेळी मला पैशांची खूप गरज होती. त्यावेळी मला एका भूमिकेसाठी विचारणा झाली. एका पत्रकाराची ही छोटी भूमिका होती. पण या भूमिकेसाठी मला तीन हजार रुपये मिळणार होते. त्यामुळे इच्छा नसतानाही मी या भूमिकेसाठी होकार दिला".
विजय वर्मा पुढे म्हणाला,"इंग्रजी भाषेतील पत्रकाराची भूमिका करणं मला कठीण जात होतं. दिलेले संवाद पाठ होत नव्हते. शेवटी मला सेटवरुन जाण्यास सांगितलं. त्यानंतर फक्त पैशासाठी कधी कोणती भूमिका करणार नाही हे मी ठरवलं. 2014 मध्ये 'मॉनसून शूटआऊट' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान घडलेली ही घटना आहे. त्यानंतर आजपर्यंत फक्त पैशासाठी मी कोणतीही भूमिका केलेली नाही".
विजय वर्मा अन् तमन्ना भाटियाच्या डेटिंगच्या चर्चा
अभिनेता विजय वर्मा (Vijay Verma) आणि तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) यांना आजवर अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरदेखील ते अनेकदा चर्चेत असतात. काही दिवसांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहे. तसेच लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. 'लस्ट स्टोरीज 2' या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान त्यांनी एकत्र काम केलं होतं. या सीरिजमधील त्यांच्या बोल्ड सीन्सची चांगलीच चर्चा रंगली. या सीरिजच्या शूटिंगदरम्यान ते रिलेशनमध्ये आपल्याची चर्चा आहे. चाहते आता त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या