Agriculture News : मॉरिशसचे कृषी उद्योग आणि अन्न सुरक्षा मंत्री मनीष गोबीन (Maneesh Gobin) यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांनी अन्न सुरक्षेच्या मुद्यावर इतर देशांशी अधिक सखोलपणे काम करावं यावर एकमत झालं. भारताचे मॉरिशस सोबतचे संबंध अत्यंत दृढ आहेत. हे संबंध केवळ राजकीय आणि व्यापारी संबंध नाहीत तर सांस्कृतिक आणि अध्यात्मिक देखील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार अत्यंत गंभीरपणे कार्य करत असून, देशाला या क्षेत्रात पुढे नेण्यासाठी अनेक मजबूत पावले उचलण्यात आली असल्याचे मत कृषीमंत्री तोमर यांनी व्यक्त केलं. 


भारताने आता केवळ देशांतर्गतच गरजा पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर इतर देशांना धान्य निर्यात करण्यासाठी देखील अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त केली आहे. यावेळी बोलताना मॉरिशसचे कृषी उद्योग आणि अन्न सुरक्षा मंत्री मनीष गोबीन म्हणाले की, त्यांचे भारताशी कौटुंबिक संबंध आहेत. मॉरिशसमधील 60 टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. पंतप्रधानांनी सौरउर्जेच्या संदर्भात सुरु केलेल्या आघाडीसारखीच अन्न सुरक्षेच्या मुद्यावर देखील आघाडी करण्यात यावी अशी विनंती  मनीष गोबीन यांनी केली.  आयसीएआर (ICAR) अर्थात भारतीय कृषी संशोधन मंडळाच्या कार्याची प्रशंसा करgन त्यांनी मंडळाशी करार करण्याची इच्छा देखील व्यक्त केली.



Agriculture News : भारत-मॉरिशस अन्न सुरक्षेच्या मुद्यावर इतर देशांशी सखोल काम करणार, मॉरिशसच्या कृषीमंत्र्यांनी घेतली मंत्री तोमर यांची भेट


भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासात आयसीएआरची भूमिका सविस्तरपणे मांडत, केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांनी मंडळाशी संलग्न कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे आणि 100 हून अधिक इतर संस्थांच्या भूमिकेचा देखील यावेली उल्लेख केला. गोबीन यांनी सामंजस्य कराराचा आराखडा निश्चित करावा, जेणेकरून त्यावर चर्चा होऊ शकेल अशी विनंती देखील नरेंद्र सिंह तोमर यांनी केली. नवी दिल्लीत मॉरिशसचे कृषी उद्योग आणि अन्न सुरक्षा मंत्री मनीष गोबीन यांनी भारताचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही देसांच्या मंत्र्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.


महत्त्वाच्या बातम्या: