Farmer Success Stories: मराठवाड्यात (Marathwada) गेल्या चार वर्षांपासून सतत अतिवृष्टीचं सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे या काळात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील होत असल्याच्या अनेक यशोगाथा (Success Stories) राज्यात पाहायला मिळतात. दरम्यान असाच काही यशस्वी प्रयोग छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने केला आहे. शेतीला दुग्ध व्यवसायाची (Dairy Farming) जोड देत त्यातून लाखो रुपयांचं नफा त्यांनी आतापर्यंत मिळवला आहे. राजु कर्डिले असे या शेतकऱ्याचं नाव आहे. 


पैठण तालुक्यातील वाघाडी गावातील राजु कर्डिले हे गेल्या अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित जमिनीवर शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र शेतीत होणारे अल्प उत्पन्न आणि सततच्या  नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांनी शेती सोबतच जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पण आर्थिक परिस्थिती पाहता त्यांनी सुरवातीला एक मैह्स घेतली. मात्र आज त्यांच्याकडे 18 गायी आणि 5 म्हशी आहेत. विशेष म्हणजे महिन्याला थोडीथोडकी नाही तर तब्बल दोन लाख रुपये त्यांना यातून मिळत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. 




 200 ते 250 लिटर दुध रोज डेरीला पाठवतात.


राजु कर्डिले यांच्याकडे वडिलोपार्जित 30 गुंठे शेती होती. यांचबरोबर त्यांनी जोडधंदा म्हणून म्हैस घेतली. कुटुंबातील सदस्यांची साथ आणि स्वतःच्या  कष्टाच्या जीवावर त्यांनी दुग्ध व्यवसायात प्रगती केली. पाहता-पाहता उत्पन्न वाढत गेले आणि आज त्यांच्याकडे 18 गायी आणि 5 मशी आहेत. विशेष म्हणजे याच दुग्ध व्यवसायातुन आज त्यांनी चार एकर जमीन खेरेदी केली आहे. सोबतच दोन मजली बंगाला देखील बांधला आहे.  आज देखील ते 200 ते 250 लिटर दुध रोज डेअरीला पाठवतात. ज्यात त्यांना  महिन्याकाठी दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सोबतच जनावरांपासून मिळणाऱ्या खतामुळे त्यांच्या शेतीला देखील फायदा होत असल्याचे कर्डिले सांगतात. 




गाईंसाठी मुक्त संचार गोठा...


गाईंसाठी कर्डिले यांनी मुक्त गोठा उभारला आहे. मुक्त संचार गोठ्यामुळे गाईंचे आरोग्य चांगले राहते. तसेच दुधाचं प्रमाण चांगले राहावे यासाठी गाईंना गवत, कडबा, मका, पेंन्ड, उसाची कुटी, असं चारा देण्यासाठी कुट्टी मशीनचा वापर करण्यात येतो. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या कामात त्यांच्या कुटुंबीयांची मोलाची साथ त्यांना मिळत असल्याचे देखील कर्डिले म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ajit Pawar : वडिलांच्या निधनानंतर गाय विकायचो अन् एक एकर जमीन घ्यायचो; अजित पवारांनी सांगितला किस्सा