Nashik Chhagan Bhujbal : नाफेड (NAFED) फार्मर्स कन्झ्युमर कंपनीसारख्याकडून किंवा व्यापाऱ्यांकडून माल घेत आहेत. मात्र व्यापारी कमी भावात घेऊन बाहेर चांगल्या विकत आहेत. त्यामुळे नाफेडने स्वतः कांदा मार्केटमध्ये (Onion Market) उतरून कांदा खरेदी करावी, तसेच नाफेडने (nafed) आतापर्यंत खरेदी केल्याची आकडेवारी सांगतली, ही आकडेवारी चुकीची असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कांदा खरेदीचे (Onion Isuue) रान पेटले आहे. विधानभवनात देखील कांदा प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. इकडे शेतकऱ्यावर कांदा पिकासह इतर पिके फुकट वाटण्याची वेळ आली आहे. आज छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिकमध्ये (Nashik) असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, आम्ही वेळोवेळी आवाज उठवतो आहे. त्यावर सरकार म्हणत आहेत की, आम्ही समिती नेमुन दुसरीकडे नाफेड बाहेर फार्मर्स कन्झ्युमर कंपनीसारख्यांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून माल घेत आहेत. व्यापारी इकडे 200-300 रुपयांनी कांदा खरेदी करत आहेत. तर नाफेडला 600 रुपयांनी देत असल्याचे भुजबळ म्हणाले. 


भुजबळ पुढे म्हणाले की, सदर प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) सांगितले की, नाफेडला  APMC मध्ये उतरायला सांगा, लासलगावमध्ये (Lasalgaon) खरेदी करायला सांगा. ट्रॅकटरवर बोली लावायला सांगा, बाहेर काहीही उपयोग नाही. नाफेडने आतापर्यंत कांदा खरेदी केल्याचे आकडे चुकीचे असल्याचे भुजबळ म्हणाले. अडीच लाख टन खरेदी झालीच नाही. मागच्या वर्षीचा हा प्रश्न नाही, आता 15-20 दिवसांपासून जो कांदा फेकला जातोय, त्याचा आहे. पुन्हा एकदा याबाबत विधानसभेत बोलू आणि नाफेडला मार्केटमध्ये उतरायला सांगण्याचा आग्रह धरू, अशी ग्वाही यावेळी भुजबळ यांनी दिली. 


तसेच नाशिकमध्ये शेतकऱ्याकडून कोथिंबीर फेकून दिली जात आहे. मेथी फेकून दिली जात आहे. अशावेळी भुजबळ म्हणाले की, कोथिंबीर, मेथी शेतकरी फेकून देत आहेत. कोथिंबीरमागे गाडी भाडेही सुटत नाही. शेतकरी मेहनत करतोय, पण रस्त्यावर माल फेकावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या पोटा पाण्याचे हाल होत आहेत. त्यावर कोण बोलणार. अस्मानी सुलतानीची पण अडचण येते. भाजीपाल्याचे भाव वाढले तर आपणही सहन करायला हवे. कांद्याचे भाव वाढले तर लगेच निर्यात बंद केली जाते, सरकार सांगत आहेत की, सांगतायत निर्यात सुरू आहे, पण आता कांदा स्वस्त आहे. म्हणून निर्यात आहे. 


श्रीलंका, बांगलादेश इथे पाठवत नाही आहे. युरोप किंवा इतर ठिकाणी कॉमर्स मिनिस्ट्रीशी जर संपर्क साधला आणि अनुदान दिले, तर दोन पैसे शेतकऱ्याना भेटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे सध्याची परिस्थिती आहे. द्राक्ष, गहू यांना फटका बसेल. सरकारला सांगणं आहे की, शेतकऱ्यांना आपण मदत करायला हवी, शेतकरी हिच महाराष्ट्रची ताकद. 60 टक्के लोक या व्यवसायात आहे. उद्योगाला करोडो रुपयांची माफी देतात, तशी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे आणि शेती वाचवायला पाहिजे, असे आवाहन यावेळी छगन भुजबळ यांनी केले.