Sanjay Raut : ज्यांना निघून जायचं ते निघून गेले. आता जे आहेत ते निष्ठावान असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं. काही लोक निघून गेल्यानंतरसुद्धा शिवसेना (Shivsena) त्याच ताकदीनं उभी आहे. शिवसेनेवर कोणताही परिणाम काही झाला नसल्याचे राऊत म्हणाले. तुम्हाला कागदावर नाव आणि चिन्ह मिळालं. पण शिवसैनिक आणि जनतेचं प्रेम तुम्हाला मिळाली नसल्याची टीका संजय राऊतांनी शिंदे गटातील आमदारांवर केली. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. हा कागदावरचा निर्णय कागदावरच राहील असेही राऊत म्हणाले.
Shivsena : शिवसेनेच्या वाढीमध्ये, संघर्षामध्ये कोकणचं मोठं योगदान
आजची खेडची सभा ही विराट आहे. कोकण हा कायमच शिवसेनेचा गड राहीला आहे.
शिवसेनेच्या वाढीमध्ये, संघर्षामध्ये सुरुवातीच्या काळापासून कोकणचं योगदान मोठं राहिलं असल्याचे संजय राऊत म्हणाले. कोकणने नेहमी बाळासाहेबांवर शिवसेनेवर श्रद्धा ठेवली. महाराष्ट्राच्या अनेक भागात उद्धव ठाकरेंच्या विराट सभा होणार आहेत. खेडनंतरची दुसरी सभा मालेगावला होणार आहे.
खेडमध्ये पक्षप्रवेश करणारे मूळचे शिवसैनिक
आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्ते शिवसेनेच प्रवेश करणार आहेत. त्याबाबत वाईट वाटण्याचं काही कारण नाही. कारण खेडमध्ये जे आज पक्षप्रवेश होत आहेत, ते मूळचे शिवसैनिक असल्याच राऊत म्हणाले. आठ दिवसापूर्वी काश्मीरी पंडीताची बायकोसमोर हत्या करण्यात आली. त्याआधी 17 ते 18 काश्मीरी पंडीतांना मारण्यात आलं. आज शेकडो काश्मीरी पंडीत आक्रोश करतायेत. पण भाजपकडून तिथे कोणी गेलं नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
काश्मीर पंडीतांची हत्या झाल्यानंतरही भाजपकडून राजकारण
काश्मीर आणि पंजाब ही संवेदनशील राज्य आहेत. काश्मीर पंडीतांची हत्या झाल्यानंतर भाजपकडून राजकारण केलं जाते. त्यांची हत्या झाल्यानंतरही भाजपला काही दुख: होत नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. भाजपडून अद्याप कोणाही तिथं गेलं नसल्याचं राऊतांनी सांगितलं.
पंजाबमध्ये पुन्ही खलिस्तानी सक्रिय होण्याचे प्रयत्न करत आहेत हे देशासाठी ठिक नसल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं यामध्ये केंद्राची मोठी जबाबदारी असल्याचे संजय राऊत म्हणाले.
जेवढ्या यात्रा काढाला तेवढी तुमची गद्दारी लोकांसमोर येईल, राऊतांचा टोला
आमच्या शिवगर्जना यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळं विरोधक हादरले आहेत. उद्धव ठाकरेंना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. कागदावर जरी त्यांना चिन्ह मिळालं तरी पाठिंबा उद्धव ठाकरेंना मिळतो. जेवढ्या यात्रा काढाला तेवढी तुमची गद्दारी लोकांसमोर येईल असा टोला राऊतांनी शिंदे गटाला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या: