Alphonso Mango : आंबा (Mango) हा फळांचा राजा आहे. त्यामध्ये कोकणातील हापूस (Hapus) हा आपल्या वेगळ्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध असून त्याला जगभरातून मागणी आहे. नैसर्गिक संकटं आणि असंख्य आव्हानं पेलत हापूस आंबा आता सातासमुद्रापार पोहोचलाय. कोकणातील (Konkan) प्रमुख शहारांमध्ये हापूसला योग्य दर मिळाला नसला तरी आखाती देशात हापूस आंब्याला चांगला दर मिळत आहे. फळ बाजारात हापूसची आवक वाढत असून, परदेशातून देखील हापूसची मागणी वाढत आहे. त्यामुळं याचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना होणार आहे.


Konkan Hapus कोकणातील आंबा निर्यातीतून दरवर्षी 340 कोटी रुपयांचे परकीय चलन 


कोकणातील हापूस आता साता समुद्रापार पोहोचला आहे. त्याची मागणीही इतर देशात वाढली आहे. कोकणातील प्रमुख शहारांमध्ये हापूसला पुरेसा दर मिळाला नाही तरी आखाती देशात चांगलाच दर मिळत आहे. कोकणात सध्या कडक उन्हाळा आहे. यात हापूसचा हंगाम सुरु झाला आहे. हापूस म्हटलं तर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. हापूसचा गोडवा आता सातासमुद्रापार असणाऱ्यांनाही लागला आहे. कोकणात खास करुन रत्नागिरी, देवगड आणि रायगड जिल्ह्यातील हापूस हा जगप्रसिद्ध आहे. कोकणात अडीच लाख मेट्रीक टन उत्पादनापैकी 25 हजार मेट्रीक टन फळाची तर 10 हजार मेट्रीक टन मॅंगो पल्पची निर्यात होते. त्यामुळं 340 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते. 


बदलत्या वातावरणाचा आंबा पिकाला फटका


कोकणात गेल्या महिन्यापासून बदलत्या वातावरणाचा फटका आंबा बगायतदारांना बसला आहे. त्यामुळं यंदा आंब्याचे पीकही कमी आले आहे. महाराष्ट्रात 5 लाख 66 हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड जाली आहे. तर 3.31 लाख मेट्रीक टन आंबा फळांचे उत्पादन झाले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी रत्नागिरीच्या हापूस आंब्याची 1200 किलोंची निर्यात इंग्लंडला झाली होती. तेजस भोसले या युवकाने इंग्लडला हापूसचा बिजनेस सुरु केला आहे. तेजस मुळचा पुण्याचा आहे. तो गेली अनेक वर्षे इंग्लंडला वास्तव्यास आहेत. आंबा हंगामापूर्वी ते रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील बगायतदारांना भेट देतात आणि निर्यातीसाठी चर्चा करतात. दरम्यान, यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट (Mango production) झाली आहे. मागील 20 वर्षांच्या तुलनेत यंदा आंब्याच उत्पादन कमी झालं आहे. बदलतं वातावरण (Climate Change) आणि पिकावर पडणारा रोगाचा प्रादुर्भाव याचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी संकटात आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Alphonso Mango : गेल्या 20 वर्षांच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचं उत्पादन कमी, वाढत्या उष्णतेसह थ्रिप्सचा प्रादुर्भाव