On This Day In History : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात 19 मार्चला विशेष महत्त्व आहे. याच दिवशी म्हणजे 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध बंडाची सुरुवात केली. ही क्रांती दडपण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सर्वस्व पणाला लावले होते. बंगालच्या बॅरकपूर कॅन्टोन्मेंटमधील 34 व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या मंगल पांडेने परेड ग्राउंडवर दोन ब्रिटीश अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि नंतर स्वत: ला गोळ्या घालून जखमी केले. 7 एप्रिल 1857 रोजी ब्रिटिश सरकारने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. स्थानिक जल्लादांनी मंगल पांडेला फाशी देण्यास नकार दिल्यावर कोलकाता येथून चार जल्लाद बोलावण्यात आले आणि देशाच्या या शूर सैनिकाला फाशी देण्यात आली.
1918: वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म.
सॅम वॉल्टन यांचा जन्म 29 मार्च 1918 रोजी झाला. खरंतर सॅम वॉल्टनने रिटेल उद्योगाचा शोध लावला नाही. पण वॉल्टनने लोकांच्या खरेदीची मानसिकता अभ्यासली आणि त्याचा योग्य प्रकारे आपल्या व्यवसायासाठी उपयोग केला आणि म्हणूनच त्यांनी अल्पावधीतच रिटेल जगताची गणितच बदलून टाकली. सॅम वॉल्टन यांनी जगाला एक नवी ‘दुकानदारी’ शिकवली, ‘वॉलमार्ट’ नावाची. 1980 च्या सुमारास ‘वॉलमार्ट’चे 276 मॉल्स अमेरिकेत उभे राहिले. पुढे तर त्यांनी वर्षाला 100 मॉल्स हे उद्दिष्ट ठेवेल आणि गाठलेही होते. आजच्या तारखेला वॉलमार्टचे जगभरात अकरा हजार तीनशे हून अधिक मॉल्स आहेत. 1985 साली जगप्रसिद्ध नियतकालीक फोर्ब्जने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणुन ‘सॅम वॉल्टन’ यांना घोषित केले होते.सॅम वॉल्टन यांनी ‘मेड इन अमेरीका’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. सॅम वॉल्टन यांचं निधन झालं त्यावेळी वॉल्टन यांचा निव्वळ नफा हा 25 बिलियन डॉलर होता.
देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 25 मार्च या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
1807: जर्मन खगोलशास्त्रज्ञ विल्हेल्म ओल्बर्स यांनी वेस्टा ग्रहाचा शोध लावला. त्याला आकाशातील सर्वात तेजस्वी छोटा तारा म्हटले गेले.
1849: महाराजा दुलीप सिंग यांनी त्यांचे दिवंगत वडील रणजित सिंग यांच्या सिंहासनाचा त्याग केला आणि पंजाब ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतला.
1859: बहादूर शाह जफर दुसरा 1857 च्या क्रांतीत सहभागासाठी दोषी आढळला आणि ब्रिटीश सरकारने त्याला रंगून येथे हद्दपार केले.
1954: दिल्लीत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे उद्घाटन झाले.
2002: दिल्ली आणि बीजिंग दरम्यान थेट व्यावसायिक उड्डाण सेवा पुन्हा सुरू झाली.
2020: देशातील कोरोना बाधितांची संख्या 1000 च्या पुढे गेली.