Gram Procurement:  देशात रब्बी पिकांच्या हंगामानंतर पीकांची (farming) कापणी सुरू झाली असून आता त्यांची खरेदी देखील सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या विविध संस्था पिकांची खरेदी करत आहेत. बाजारपेठांमध्ये सध्या शेतमाल विकण्याची लगबग सुरू असून शेतकरीसुद्धा बाजारपेठांमध्ये जाऊन आपला शेतमाल विकत आहेत. सध्या देशात हरभऱ्याची (Gram Procurement) खरेदी सुरू झाली असून हरभरा खरेदी सध्या चांगलाच जोर धरत आहे. बाजारपेठांमध्ये शेतकरी (farmer) त्यांचा हरभऱ्याचा माल घेऊन पोहचले आहेत. हरभरा खरेदीचा संपूर्ण तपशील केंद्र सरकारकडून गोळा करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात हरभऱ्याची विक्रमी खरेदी होत आहे. तसेच येणाऱ्या काळात ही खरेदी आणखी वेगवान होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


हरभरा खरेदीत महाराष्ट्र अव्वलस्थानी


केंद्र सरकार हरभरा खरेदीचे आकडे सध्या एकत्रित  करत आहे. या आकडेवारीनुसार, हरभरा खरेदीमध्ये देशात महाराष्ट्र राज्य अव्वलस्थानी आहे. महाराष्ट्रात 4.93 लाख टन हरभऱ्याची खरेदी झाली आहे. ही खरेदी देशात सर्वात जास्त आहे.  तर दुसऱ्या स्थानी मध्य प्रदेश राज्य आहे. मध्य प्रदेशात एकूण 2.67 लाख टन हरभऱ्याची खरेदी झाली आहे. गुजरात तिसऱ्या स्थानावर असून गुजरातमध्ये 2.23 लाख टन हरभऱ्याची खरेदी  झाली आहे. 


ही राज्य हरभरा खरेदीमध्ये मागे...


देशातील अनेक राज्यात हरभरा खरेदी खूप कमी होत आहे. बरीच राज्य हरभरा खरेदीमध्ये मागे पडत आहेत.  यामध्ये राजस्थानची परिस्थिती अत्यंत वाईट असून फक्त 10,839 टन खरेदी करण्यात आली आहे. तर कर्नाटकात 68,268 टन आणि तेलंगणात 50,238 टन हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. या राज्यात आता सरकार हरभरा खरेदीवर जोर देत आहे.  


एमएसपी पेक्षा कमी भावाने होतेय हरभरा खरेदी 


देशात हरभरा एमएसपीपेक्षाही कमी भावाने विकला जात आहे. हरभऱ्याची एमएसपी किंमत 5,335 रुपये इतकी आहे, पण हरभरा फक्त 4,700 ते 4,800 प्रति क्विंटल भावाने विकला जात आहे. या दोन्ही किंमतीत 500 ते 600 रुपायांचा फरक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हरभरा खरेदीमध्ये आलेल्या मंदीमुळे नाफेडने वेगवेगळ्या राज्यात हरभरा खरेदीवर जोर दिला आहे. 20 एप्रिलपर्यंत नाफेडने 11.68 लाख टन हरभऱ्याची खरेदी केली आहे. आनंदाची बाब ही की यावर्षी देशात 13.63 मिलयन टन हरभऱ्याचे उत्पन्न होऊ शकते. गेल्या वर्षी देशात 13.54 मिलियन टनाचे उत्पन्न झाले होते. 


 


संबंधित बातमी