Rain Effect on Cotton Crop : गेल्या पंधरवड्यात राज्यभरात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. कापूस पिकासाठी पाऊस आवश्यक असला तरी काही भागात जास्तीचा पाऊस झाल्याने कापूस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, या विषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. पावसाळ्यात कापसाची नेमकी कशी काळजी घ्यावी, याबाबत कापूस पिकाबाबत कापूस तज्ज्ञांनी काय सांगितलंय जाणून घ्या.


पावसाळ्यात कापसाची काळजी कशी घ्यायची?


सलग पाऊस सुरू असल्याने शेतीमध्ये मशागत करण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नसल्याने अनेक शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढले असून या तणाचं नियत्रंण करण्यासाठी शेतकऱ्यांनी मजुरांकडून किंवा तणनाशकाचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शन खाली उपयोग करणे गरजेचे आहे. शेतात सध्या कापूस पिकात पाणी साठून राहिल्याने कापूस पिकाची वाढ थांबून हे पीक खराब होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने शेतात साठून असलेले पाणी चर काढून शेताच्या बाहेर काढणे गरजेचे आहे.


पिकाबाबत कापूस तज्ज्ञांचं मार्गदर्शन जाणून घ्या


सतत ढगाळ वातावरण राहिल्याने कापूस पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे यासह विविध कीड रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने तज्ञांच्या मार्गदर्शन खाली कीडनाशक आणि बुरशीनाशक वापरून त्यावर नियत्रंण मिळविले पाहिजे. त्यासाठी योग्य त्या प्रमाणात निंबोळी अरकासह विविध कीडनाशक किंवा बुरशीनाशक वापरणे गरजेचे आहे.


कामगंध सापळे वापरण्याचा सल्ला


यासोबत निळे, पिवळे, चिकट सापळे वापरणे गरजेचे आहे, जेणेकरून कीड नियंत्रण करणे सोपे होईल. कापूस फुलाच्या अवस्थेत असेल तर कामगंध सापळे वापरले तर, गुलाबी बोंड अळी नियंत्रण करता येते. त्यामुळे कामगंध सापळे वापरण्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.


खत व्यवस्थापन आवश्यक


खत व्यवसस्थापन करताना एक बॅग, दहा सवीस, अर्धी बॅग युरिया, पाच किलो झिंक सल्फेट, दोन किलो बॉर्यक्स, पाच किलो फेरस सल्फेट, पाच किलो मॅगनेशियम सल्फेट याचा बेसल डोस देणे गरजेचे आहे. वेळीच योग्य प्रमाणत खत व्यवस्थापन केले तर, कापूस उत्पादनात वाढ होत असल्याचं दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने या उपाययोजना करण्याचा सल्ला कापूस तज्ज्ञांनी दिला आहे. (How to take Care of Cotton Crop in Monsoon Season)


 संबंधित इतर बातम्या :


Jalgaon Crime News : वसतीगृहाच्या काळजीवाहकाकडून 5 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, अधिक्षिका पत्नीनं लपवला प्रकार