Jawahar Chana 24 : हरभरा (Gram) हे एक प्रमुख कडधान्य पीक आहे. या पिकाची लागवड रब्बी हंगामात (Rabi season) केली जाते. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि बिहारमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान हरभऱ्याची पेरणी केली जाते. यातून हरभऱ्याचे बंपर उत्पादन मिळते. यंदा शेतकऱ्यांना हरभराऱ्याची लागवड करणं सोपं होणार आहे. कारण, जवाहरलाल नेहरु कृषी विद्यापीठाच्या (Jawaharlal Nehru Krishi Vishwavidyalaya) शास्त्रज्ञांनी हरभऱ्याची एक विशेष जात विकसित केली आहे. 'जवाहर चना 24' (Jawahar Chana 24) असं या हरभऱ्याच्या नवीन जातीचं नाव आहे. या जातीच्या हरभऱ्याची हार्वेस्टरनं काढणी शक्य होणार आहे. त्यामुळं त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
मध्य प्रदेश हे हरभऱ्याचे प्रमुख उत्पादक राज्य आहे. प्रमुख हरभरा उत्पादक राज्यामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात हरभऱ्याची पेरणी केली जाते. यातून हरभऱ्याचे बंपर उत्पादन मिळते. यंदा शेतकऱ्यांना हरभरा लागवड करणे सोपे होणार आहे. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हरभऱ्याची एक विशेष जात विकसित केली आहे. जवाहर चना 24 असे हरभऱ्याच्या नवीन जातीचं नाव आहे. जी पोषणाच्या दृष्टीनं अधिक फायदेशीर ठरेल. तसेच, ते शेतकऱ्यांसाठी मोठ्या उत्पन्नाचं साधन बनणार आहे. या नवीन जातीच्या हरभऱ्याची काढणी हार्वेस्टरनं शक्य होणार आहे. त्यामुळं जिथे हरभरा काढणीला अनेक दिवस लागायचे, तिथे आता काढणी लगेच होणार आहे.
जवाहर चना 24 बद्दल माहिती
साधारणत: हरभऱ्याची लांबी 45 ते 50 सेमीपर्यंतच असते. परंतू, जवाहरलाल नेहरु कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी जवाहर चना 24 या हरभऱ्याची विशेष जात विकसित केली आहे. ज्याची कापणी हार्वेस्टरने करता येते. या नवीन हरभऱ्याच्या झाडाची ऊंची 65 सेमी होते. त्यामुळं यंत्राच्या सहाय्यानं काढणी शक्य होते. या जातीचे धान्य सामान्य जातींपेक्षा मोठे, आकर्षक आणि तपकिरी रंगाचे असते. याच्या रोपाची देठ देखील जाड, मजबूत आणि जोरदार वारा सहनशील आहे. ही जात 110 ते 115 दिवसांत तयार होते.
महाराष्ट्रातही जवाहर चना 24 करता येणार लागवड
प्राध्यापिका डॉ. अनिता बब्बर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय चना एकात्मिक प्रकल्प जबलपूरने मध्य भारतीय राज्यांसाठी जवाहर चना 24 ही जात विकसीत केली आहे. आता मध्य प्रदेश व्यतिरिक्त महाराष्ट्रातील बुंदेलखंड प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही जवाहर चना 24 ची लागवड करुन चांगले उत्पादन घेता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Ajit Nawale : हरभरा उत्पादकांना वाऱ्यावर सोडाल तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतू, किसान सभेचा इशारा