Dr Mansukh Mandaviya : भारताने रसायन आणि खतांच्या जागतिक बाजारपेठेचे नेतृत्व करणारे असे स्वतःचे मॉडेल बनवावे असं आवाहन केंद्रीय रसायन आणि खतमंत्री डॉ. मनसुख मांडविया (Dr Mansukh Mandaviya) यांनी केलं. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या दृष्टीकोनास पूरक असे जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याची क्षमता रसायन आणि खत क्षेत्रात असल्याचे मांडविया म्हणाले. रसायन आणि पेट्रोकेमिकल्स सल्लागार मंचाच्या तिसऱ्या बैठकीत मनसुख मांडविया बोलत होते. यावेळी खते आणि रसायन खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा (Bhagawanth Khuba) हेही उपस्थित होते.


भारताकडे आव्हानावर मात करण्याची क्षमता


भारतीय रसायन आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगाकडं राष्ट्राच्या विकासाला चालना देण्यात लक्षणीय भूमिका बजावण्याची महत्वपूर्ण क्षमता आहे. त्यामुळं, खते आणि रसायनांच्या जागतिक बाजारपेठेचे नेतृत्व करणारे स्वतःचे असे मॉडेल भारताने तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मांडविया म्हणाले. जागतिक मागणी आणि संलग्न उद्योगांच्या उदयोन्मुख गरजा यांच्या अनुरुप असे भविष्योन्मुख धोरण ठरवावं, असं आवाहन देखील त्यांनी कंपन्या आणि सल्लागार मंचाला केलं. भारताकडे आव्हानावर मात करण्याची क्षमता आहे, मात्र, त्यासाठी इच्छित परिणामांवर लक्ष केंद्रित करणारे धोरण तयार करण्याची गरज असल्याचे मांडविया म्हणाले. 


स्वतःचे निर्णयक्षम मॉडेल तयार केले पाहिजे


भारताला देशांतर्गत आणि जागतिक गरजा भागवण्यासाठी सक्षम असे आमचे स्वतःचे निर्णयक्षम मॉडेल तयार केले पाहिजे.  जे सल्लागार पद्धतीचे आणि बहुआयामीही असेल, यावर डॉ. मांडविया  यांनी यावेळी प्रकाश टाकला. त्यांनी उद्योग आणि तज्ज्ञांना देशांतर्गत गरजांचा विचार करणारे अशा संशोधन आणि विकास प्रकल्पात भागीदारी करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन देखील केलं. मध्यम, लघु आणि सूक्ष्म क्षेत्रासारख्या  (एमएसएमई) विशिष्ट क्षेत्रांमधील आव्हाने आणि गरजा भागवल्या जातील. यासाठी संशोधन आणि विकास प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करायला हवे, असे देखील डॉ. मांडविया  म्हणाले. या  बैठकीला संबोधित करताना भगवंत खुबा यांनी सरकारच्या उद्योगांना अनुकूल अशी धोरणे आणि देशात व्यवसाय करण्यास अनुकूल अशा हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांवर प्रकाश  टाकला. भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे ते म्हणाले. राष्ट्राच्या विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावण्याची विशाल क्षमता भारतीय रसायन आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगांमध्ये असल्याचेही भगवंत खुबा म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या: