Petrol Diesel Price Today 21 September 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. तुम्ही कामासाठी घराबाहेर पडणार असाल आणि त्यापूर्वी गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी एकदा पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) नवे जर जाणून घ्या. देशातील तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल (Petrol Prices) -डिझेलच्या (Diesel Prices) दरांत कोणताही बदल केलेला नाही. दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai), कोलकाता (Kolkata) आणि चेन्नई (Chennai) देशातील या चार महानगरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत. 

आजचे कच्च्या तेलाचे दर 

आज कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत पुन्हा घसरण होत असल्याचं दिसत आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 90 डॉलरच्या जवळ आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत फेब्रुवारीच्या 139 डॉलरच्या उच्चांकावरून 30 टक्के स्वस्त झाली आहे. पण याचा फायदा किरकोळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर झालेला नाही. आज ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 90.19 डॉलर आणि WTI क्रूड प्रति बॅरल 84.45 डॉलरवर आलं आहे.

देशातील चार प्रमुख महानगरांतील दर 

शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
चेन्नई 102.63 रुपये 94.24 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये

राज्यातील प्रमुख शहरातील दर काय?

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.04 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 92.59 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे. परभणीत पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).